मुंबई : झी मराठी कायमच प्रेक्षकांच्या भेटीला नवनवी मालिका घेऊन येत असता. नातेसंबंधांतील वेगवेगळे पैलू या मालिकांद्वारे प्रेक्षकांसमोर मांडल्या जातात. झी मराठीवर अशीच एक नवी मालिका सुरू होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठीवर पांडू इलो... म्हणत 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीला येत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला. यामुळे प्रेक्षकांना ही मालिका पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. 


नाईकांचा वाडा आणि आयेपासून सुशल्या, दत्ता, नेने वकील, अभिराम, विश्वासराव, पांडू अशा अनेक मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. त्यामुळे हा प्रोमो पाहताच चाहत्यांनी सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमधून ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचं नाव घेतलं आहे.



कोणतेही प्रथितयश नसलेले कलाकार या मालिकेत असतानाही त्यांच्या व्यक्तिरेखांनी प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. आता पुन्हा एकदा झी मराठी नाईकांच्या वाड्यातील रहस्यांचा उलगडा करणार असल्याचं दिसत आहे. 


या मालिकेत पांडूची भूमिका करणारा अभिनेता प्रल्हाद कुडतरकर याने या मालिकेचं लेखन केलं होतं. तसेच या मालिकेतील सुशल्या म्हणजे ऋतुजा धर्माधिकारी हिला देखील प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. त्यामुळे आता ही सगळी पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 


कोकणाच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली, एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा माग घेताना कोकणातील सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांचा आधार घेत रचलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला सुरुवातीला विरोध झाला होता. मात्र त्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली