Raveena Tandon Childhood Photos: हल्ली सेलिब्रेटींचे लहाणपणीचे फोटोज अनेकदा व्हायरल (viral news) होत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सगळीकडे व्हायरल होतो आहे. 90 च्या दशकात बॉलिवूड खूप विस्तारत जात होते. त्यामुळे तेव्हा बॉलिवूड सेलिब्रेटींची (Bollywood Celebs) चर्चाही कायमच होत होती. अनेक मॅगझिन्स आणि टिव्ही चॅनल्स मधून बॉलिवूड अभिनेत्रींच्या चर्चा होत राहिल्या आहेत. 90 च्या काळात माधूरी दीक्षित, दिव्या भारती, जूही चावला, रविना तंडन, पूजा भट्ट, नम्रता शिरोडकर, सोनाली बेंद्रे (90's Top Actresses) अशा अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. तेव्हा तद्दन व्यावसायिक चित्रपट बनले जायचे. त्यामुळे तेव्हाची लोकप्रियता आजही कायम आहे. आजही आपण त्या काळातील सिनेमे आवडीनं पाहतो. असे सिनेमेही कायम व्हायरल होतात.(raveena tandon childhood photos goes viral akshay kumar dated her once rumors news entertainment)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर तर त्या काळातील लोकप्रिय सीन्सही व्हायरल होत असतात. संजय दत्त आणि माधूरी दीक्षितच्या अफेअरप्रमाणे एका अजून सेलिब्रेटी हिरो हिरोईनच्या लिंक अपची तेव्हा चर्चा होती आणि ती म्हणजे रविना तंडन आणि अक्षय कुमार यांच्या (Link up) अफेअरची तेव्हा जोरात चर्चा होती. 


ही अभिनेत्री आहे रविना तंडन. रविना तंडन (Raveena Tandon) आणि अक्षय कुमारच्या अफेअरच्या त्यावेळी खूप चर्चा होत्या. त्याचबरोबर त्यांच्या ब्रेकअपच्याही खूपच चर्चा होऊ लागल्या होत्या. मोहरा या चित्रपटापासून या दोघांची ओळख झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करू लागले होते. सध्या या दोघांच्या अजूनही चर्चा होताना दिसतात. किंबहूना आजही त्यांना यावर प्रश्नही विचारले जातात. या चित्रपटानंतर ते एकमेकांना डेट करत असले तरी त्यांच्या नात्यात दूरावा येयलाही फारसा वेळ लागला नाही. त्यावेळी अक्षयनं रविना तंडनसोबत ब्रेकअप केलं होत आणि शिल्पा शेट्टीसोबत डेट करायला सुरूवात केली होती. त्यामुळे त्यांच्या नात्यातही दुरावा आला होता. 


रविना ही चित्रपटसृष्टीपासून बराच काळ दूर होती परंतु आता ती ओटीटीवर (OTT) आपल्या अभिनयानं सगळ्यांना घायाळ करते आहे. मध्यंतरी तिचं वय दिसून लागलं आहे म्हणून तिच्यावर टीकाही झाली होती. या फोटोत ती तिच्या वडिलांसोबत दिसते आहे. या फोटोत ती खूपच लहान आहे. तिचा दात तुटलेला आहे. तिचा हा फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 90 च्या दशकात तिनं आपली वेगळी अशी छाप पाडली होती. 



सोशल मीडियावर तिचा हा फोटो व्हायरल झाल्यानं ती नक्की कोण आहे याचा प्रश्नही नेटकऱ्यांना पडतो आहे. सध्या तिच्या या फोटोनं नेटकऱ्यांना प्रश्नात पाडलं आहे. आजही तिचे फॅन्स तिला रूपेरी पडद्यावरती बघण्यासाठी उत्सुक आहेत.