रवीना टंडनला `या` व्यक्तीकडून लग्नाचं प्रपोझल
कुणी केली एवढी हिम्मत?
मुंबई : रवीना टंडनने 90 च्या दशकातील काळ हा गाजवला आहे. आपला अभिनय, कॉमेडीचा टायमिंग यामुळे रवीना टंडनचे अनेक सिनेमे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. रवीना टंडनच्या हास्याने तेव्हा ही लोकं घायाळ होतं असतं आणि आजही. अखियों से गोली मारे... असं म्हणणारी रवीना आजही चाहत्यांना घायाळ करत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण वयाच्या 43 व्या वर्षी रवीनाला लग्नाची मागणी घालती आहे.
डॉ अनवर अली या व्यक्तीने ट्विटरवर 43 वर्षाच्या रवीना टंडनला लग्नासाठी मागणी घातली आहे. तू माझ्याशी लग्न करू शकतेस का? असं विचारून लग्नाची मागणी घातली आहे. अगदी चुकीच्या पद्धतीत इंग्लिश लिहून प्रपोझ केलेल्या या व्यक्तीला रवीनाने तात्काळ थांबवलं. सॉरी यार, तू 13 वर्ष उशिर केलास असं म्हणत तिने त्याचं प्रपोझल नाकारलं. पण या अन्वर अलीला नेटीझन्सने मात्र त्याच्या घाणेरड्या इंग्रजीमुळेच चांगलच फटकारलं आहे. माहित नसलेल्या चाहत्यांसाठी रवीना टंडनने अनिल थाडानीशी लग्न केलं आहे.
रवीना ही पहिली अभिनेत्री नाही जिला चाहत्यांकडून अशी लग्नाची मागणी आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला लग्नासाठी प्रपोझ करतात. या अगोदर तिस्का चोप्रा, दिव्या दत्ता आणि शशी थरूर यांना देखील असं प्रपोझल आलं आहे.