Raveena Tandon travel in Metro : 90 च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडनही एक आहे. त्या काळातील टॉप अभिनेत्रींमध्ये रवीनाचं नावं आहे. अजूनही रवीनाची लोकप्रियता ही कमी झालेली नाही. रवीनाची स्टाईल, तिच्यात असलेलं टशन, ते गोड स्वभाव. रवीना वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. रवीनाचे  आता चर्चेत असण्याचं कारण तिचा मेट्रोतील प्रवास आहे. अनेक सेलिब्रिटींप्रमाणे रवीनानं देखील मेट्रोनं प्रवास केला आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवीनाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. त्यावेळी ती पापाराझींशी बोलताना दिसते की आपण थांबूया नको सरळ चालत राहुया, म्हणजे कोणाला त्रास होणार नाही, असं पापाराझींना बोलते. त्यामुळे थांबू नका. रवीना मेट्रो स्टेशनवर स्पॉट झाली. यावेळी रवीनानं ग्रे रंगाचं शर्ट आणि स्कर्ट परिधान केला आहे. यावेळी रवीना ही चांगलीच स्टायलीश आणि कम्फर्टेबल दिसत होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कम्फर्टेबल गाडी सोडून रवीना टंडननं मेट्रोनं प्रवास केला. तर रवीनाला पाहताच तिथे असलेले सगळे लोक वेडे झाले. ते रवीनासोबत फोटो काढण्यासाठी किंवा फक्त तिचा फोटो काढण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसले. अशात मेट्रोत ट्रॅव्हल करणाऱ्या प्रवाशांना रवीनाला त्यांच्यासोबत पाहून फार आनंद झाला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रवीनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या एका वेब शोमध्ये दिसते. 'कर्मा कॉलिंग' ही तिची सध्या चर्चेत असलेली सीरिज आहे. या सीरिजमध्ये नम्रता सेथ, वरूण सूद, विक्रमाजीत विर्क, विराफ पटेल, रोहित रॉय आणि वालुशा डी सूसा यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सध्या ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. 


हेही वाचा : आर्थिक अडचणींचा सामना करतेय प्रियांका चोप्रा? ...म्हणून स्वप्नातलं घर सोडलं!


रवीनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरट 'पटना शुक्ला'मध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत अरबाज खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय ती अक्षय कुमारसोबत 'वेलकम : टू द जंगल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत श्रेयस तळपदे, अनिल कपूर, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस आणि इतर काही कलाकार दिसणार आहेत. याशिवाय रवीनाकडे 'केजीएफ : चॅप्टर 2' हा चित्रपट देखील आहे.