आर्थिक अडचणींचा सामना करतेय प्रियांका चोप्रा? ...म्हणून स्वप्नातलं घर सोडलं!

Priyanka Chopra and Nick Jonas Left Home : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसनं लॉस एंजलिसमधील घर सोडलं असून त्याचं कारण अखेर समोर आलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 1, 2024, 05:09 PM IST
आर्थिक अडचणींचा सामना करतेय प्रियांका चोप्रा? ...म्हणून स्वप्नातलं घर सोडलं! title=
(Photo Credit : Social Media)

Priyanka Chopra and Nick Jonas Left Home : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं 2018 मध्ये अमेरिकन सिंगर निक जोनससोबत जोधपुरमध्ये लग्न केलं. लग्नानंतर प्रियांका पती निक जोनससोबत अमेरिकेत शिफ्ट झाली. ते दोघं लॉस एंजलिसमध्ये राहतात. तर ते ज्या ठिकाणी राहतात त्या घरातील अनेक फोटो प्रियांका सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्यासोबत मालती मेरीटे घराच्या आवारात खेळतानाचे फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतात. आता अशी माहिती समोर आली आहे की त्या दोघांनी त्यांचं हे घरं सोडलं आहे. चला तर जाणून घेऊया त्यामागचं नक्की कारण काय आहे.

प्रियांकाचं हे घर 20 मिलियन डॉलर म्हणजेच (149 कोटी रुपयांच) घर का सोडलं त्याचं कारण देखील समोर आलं आहे. Reddit वर एका पोस्टमध्ये रिपोर्टमध्ये म्हटलं की प्रियांका चोप्रा आणि निक जोनसनं त्यांचं 20 मिलियन डॉलरचं लॉस एंजलिसमधील त्यांचं खर सोडलं आहे. रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की हे जोडपं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना घरं भाडं म्हणून 100,000 अमेरिकी डॉलर दरमहिन्याला द्यायचे होते. ते घरं भाडं देऊ शकत नव्हतं. त्यामुळे त्यांनी घर खाली केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरं कारण समोर

खरंतर पेज सिक्सच्या एका रिपोर्टनुसार, कपलनं सांगितलं की ते घर आता राहण्याजोगं राहिलं नाही. वॉटर डॅमेजसंबंधीत समस्येमुळे भिंतीला ओल पकडू लागलं आहे. त्यामुळे घरात पपडी येऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी हे घर खाली केलं आहे आणि ज्या सेलरकडून त्यांनी हे घर घेतलं होतं त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई देखील करणार आहेत. त्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे की अशा घरात राहणं आरोग्यासाठी चांगलं नाही. तक्रारीनुसार, 2019 मध्ये घर खरेदी केल्यापासून हळू-हळू अनेक समस्या उद्भवू लागल्या. सगळ्यात आधी पूल आणि मग स्पा एरियामध्ये अनेक समस्या सुरु झाल्या. त्यानंतर घरात आणि बार्बीक्यू एरियात वॉटरप्रूफिंगची समस्या सुरु झाली. घरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणी गळती होऊ लागली होती. 

हेही वाचा : 16 वर्षांनंतर 'भूतनाथ' मधील 'बंकू' आता कसा दिसतो एकदा पाहाच!

रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की प्रियांका चोप्रा आणि निक जोनसनं सेलरकडून या सगळ्या गोष्टींची भरपाई मागितली आहे. त्यांनी म्हटलं की आता रिपेअरिंगमध्ये त्याचे 1.5 मिलियन डॉलर खर्च केले आहेत आणि आता देखील सतत खर्च सुरुच आहे. कपलनं एकूण 13-20 कोटी रुपये वॉटर लॉगिंगसाठी खर्च केले. अशात प्रियांका आणि निकनं हे घर सोडण्याचा निर्णय घेतला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x