मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'भारत' चित्रपटाच्या दमदार कामगिरी नंतर तो आता 'दबंग ३' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याचप्रमाणे सलमानने छोट्या पडद्यावर सूत्रसंचालनाचे काम सुद्धा चोख रित्या पार पाडले आहे. विनोदवीर कपिल शर्माच्या शोला निर्मित केल्यानंतर त्याचा मोर्चा टी.व्ही. प्रॉडक्शनकडे वळला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान लवकरच छोट्या पडद्यावर डान्स रियालिटी शो निर्मित करणार आहे. 'नच बलिये' या शोला खुद्द सलमान निर्मीत करणार आहे. शिवाय या शोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रवीना तंडन देखील झळकणार आहे. रवीना शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावताना दिसणार आहे.


रवीनाने स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून तिचा शो मधील पहिला लूक जारी केला. 'नच बलीये'च्या ९व्या भागाचे परीक्षण करण्यासाठी रवीना सज्ज झाली आहे. फार मोठ्या काळानंतर सलमान-रवीना एकत्र काम करताना चाहत्यांच्या समोर येणार आहेत. तर दुसरीकडे शोच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी मनीष पॉलच्या खांद्यावर आहे.