मुंबई : अमिताभ बच्चन यांना 'मजबूर' आणि 'खुद्दार' सारखे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झाले. (Ravi Tandon Passes Away) आग्रामध्ये जन्माला आलेले दिग्दर्शक यांनी सुरुवातीच्या काळामध्ये 'अनहोनी' आणि 'खेल खेल में' सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री रवीना टंडन त्यांची मुलगी आहे. (Ravina Tondon Father Ravi Tandon Passes Away) संजीव कुमार यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या रवी टंडन यांनी चित्रपट दिग्दर्शक आरके नय्यर यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.


'लव्ह इन शिमला' आणि 'ये रास्ते हैं प्यार के' या चित्रपटांमधून चित्रपट दिग्दर्शनातील बारकावे शिकल्यानंतर रवी टंडन यांनी दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट 'अनहोनी' केला.


या चित्रपटातील संजीव कुमार यांच्या अभिनयाचे आजही कौतुक होत आहे. यानंतर त्यांनी ऋषी कपूरसोबत 'खेल खेल में' हा चित्रपट बनवला, त्याचा रिमेक म्हणून अक्षय कुमारचा 'खिलाडी' चित्रपट बनवला गेला.


रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. रवीना टंडननेही तिच्या वडिलांचे फोटो शेअर करत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.



त्यांच्या या पोस्टला चित्रपट जगतातील तमाम मंडळी श्रद्धांजली वाहत आहेत. "तू नेहमी माझ्याबरोबर चालशील, मी नेहमीच तुझा असेन, मी कधीही जाऊ देणार नाही. लव्ह यू बाबा" अशी भावनिक पोस्ट रवीना टंडनने शेअर केली आहे.