मुंबई : चित्रपट निर्माते रवींद्र चंद्रशेखर (Ravindra Chandrashekhar) यांचं नुकतंच दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मी (Mahalakshmi) सोबत लग्न पार पडलं. दोघांनी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. या लग्नाचे आता फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान हे जोडपं पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.दरम्यान रवींद्र चंद्रशेखर यांची नववधू खुपच ग्लॅमरस आणि सुंदर आहे. तिच्या फोटोची सोशल मीड़ियावर चर्चा रंगली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवींद्र चंद्रशेखर (Ravindra Chandrashekhar) आणि अभिनेत्री महालक्ष्मीच्या (Mahalakshmi) लग्नाचे फोटो पाहून अनेकांना आश्चर्य़ाचा धक्का बसला होता. दोघांमध्ये प्रेम नसल्याचीही चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चेवर अभिनेत्रीने लग्नानंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या, ज्यामध्ये तिने तिच्या पतीवरील प्रेम व्यक्त केले.



लग्नानंतर महालक्ष्मीने (Mahalakshmi) चाहत्यांसोबत पहिली पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले की, प्रेम परिपूर्ण असण्याची गरज नाही, ते फक्त खरे असले पाहिजे,असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले होते. 



लग्नाचे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'माझ्या आयुष्यात तू आहेस म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजते. तू माझ्या प्रेमाने माझे आयुष्य भरले. लव्ह यू अम्मू, असे तिने लिहले होते. 


दुसरे लग्न 
अभिनेत्रीचे हे दुसरे लग्न आहे. तिला पहिल्या लग्नापासून एक मुलगा देखील आहे. दोघांमध्ये जमले नाही, त्यानंतर दोघेही वेगळे झाले. आणि या अभिनेत्रीने आता दुसरे लग्न केले आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाले असून चाहते या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत.काही लोकांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे, तर अनेकांना विश्वास बसत नाहीये.  


मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची भेट 'विडियम वरई कथिरू' दरम्यान झाली होती. इथून दोघांची जवळीक वाढली. तर महालक्ष्मीने (Mahalakshmi) 'वाणी रानी', 'चेल्लामय', 'ऑफिस', 'अरासी', 'थिरु मंगलम', 'यामिरुक्का बायमेन' आणि केलाडी कन्मणी यांसारख्या मालिकांमध्ये दिसली आहे. त्याचबरोबर रवींद्र चंद्रशेखर (Ravindra Chandrashekhar) यांनी 'नलनाम नंदिनियम', 'सुट्टा कढाई', 'नटपुना एन्नानु थेरयुमा' आणि 'मुरुंगकाई चिप्स' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.