मुंबई : अभिनेता रणवीर सिंग याला तब्बल २४ वेळा कानाखाली मारल्याचं सांगितल्यावर तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना. पण या संदर्भात स्वत: रणवीर सिंगने खुलासा केला असेल तर... पाहूयात काय आहे हा प्रकार.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' या आगामी सिनेमाच्या शूटींग दरम्यान अभिनेता रजा मुराद यांनी चक्क २४ वेळा रणवीरच्या कानशिलात लगावली.


सिनेमाच्या शूटींग दरम्यान एका सीनमध्ये अभिनेता रजा मुराद हे रणवीर सिंगच्या कानाखाली लगावणार होते. मात्र, हवा तसा सीन शूट होत नसल्याने रिटेक करत-करत रझा मुराद यांना २४ वेळा रणवीरच्या कानशिलात मारावी लागली.


अभिनेता रणवीर सिंग याने या संपूर्ण प्रकारासंदर्भात माहिती दिली आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं होतं. या वृत्तपत्राचं कात्रण रणवीरने ट्विटरवर शेअर करत असे झाल्याच्या वृत्ताला दूजोरा दिला आहे.



अभिनेते रझा मुराद यांनी रणवीरच्या २४ वेळा कानाखाली लगावल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना हवा तसा सीन शूट झाला.