मुंबई :  अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिनं रणवीर सिंग याच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली. असं असलं तरीही रणवीरसोबतच्या नात्यापूर्वी दीपिकाचं नाव इतर काही व्यक्तींशी जोडण्यात आलं होतं. यातलाच तिचा एक बहुचर्चित आणि तेव्हा नाव जोडलं जाणारा प्रियकर होता, सिद्धार्थ मल्ल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्य सम्राट विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ आणि दीपिकाच्या नात्यानं एकेकाळी साऱ्यांच्या नजरा वळवल्या होत्या. पण, त्यांचं हे नातं पूर्णत्वास जाऊ शकलं नाही. अखेर या दोघांच्याही वाटा विभक्त झाल्या. दीपिकानं एका मुलाखतीत यासंदर्भात मोकळेपणानं वक्तव्य केलं होतं. किंबहुना तिनं ब्रेकअप होण्यामागचं कारण सांगितलं होतं. 


त्यावेळी मुलाखतीत दीपिका म्हणालेली, 'हे नातं पुढे सुरु ठेवण्यासाठी मी फार प्रयत्न केले. पण सिद्धार्थचा स्वभाव फार वाईट होत चालला आहे. अगदी हल्ली आम्ही डिनरसाठी भेटलो होतो तेव्हा त्यानं सर्व बिलं मलाच भरायला दिली. माझ्यासाठी हे सारंकाही फारच खजिल करणारं होतं. हे नातं संपवण्यावाचून माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. कारण त्या नात्यात असं काहीच उरलं नव्हतं, ज्यामुळं मी त्याबाबत आशावादी राहीन.'


दीपिकानं सिद्धार्थच्या या विचित्र सवयीमुळे त्याच्यासोबत दुरावा पत्करण्यास प्राधान्य दिलं. ज्यानंतर तिनं आपल्या चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली.