मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर येत्या 8 मे रोजी बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. मुंबईत होणार्‍या या शाही विवाहसोहळ्यासाठी कपूर कुटुंबीयांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटी देखील सहभागी होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरूण धवन, जॅकलीन फर्नांडीस सोनम कपूरच्या संगीत सोहळ्यासाठी रिहर्सल करत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. सोबतच अर्जुन कपूर, जान्हवी आणि खुशी कपूरदेखील या संगीत सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. मात्र सोनमच्या लग्नामध्ये करिना कपुर, दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ मात्र सहभागी होणार नाही. 


लंडनहून रवाना होणार करिना कपूर  


सोनम कपूर सोबत करिना आगामी ' वीरे दी वेडिंग' या सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहे. मात्र सोनमच्या लग्नामध्ये करिना सहभागी होणार नाही. पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, करिना सोनमच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. करिना कपूर सैफ आणि तैमुरसह शनिवारी लंडनला गेली आहे. 


दीपिका,प्रियांका आणि अनुष्का राहणार अनुपस्थित  


दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा या अभिनेत्री न्यूयॉर्कमध्ये 8 मे रोजी होणार्‍या मॅट गालाचा हिस्सा होणार आहेत. तर अनुष्का 'झिरो' या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या अमेरिकेतील शेड्युलमध्ये सहभागी होणार आहेत.  


कान्स फेस्टिवल्समध्ये कॅटरिना आणि ऐश्वर्या राय 


कान्स या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी कॅटरिना कैफ आणि ऐश्वर्या राय रवाना झाल्या आहेत. सोनम कपूर  मुंबईत 8 मे रोजी विवाहबद्ध होईल.