... म्हणून निक जोनास त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलींना डेट करतो
18 ऑगस्टला मुंबईत निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांनी त्यांच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब केलं.
मुंबई : 18 ऑगस्टला मुंबईत निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांनी त्यांच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब केलं. निक प्रियांकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये या विषयी खूप चर्चा रंगल्या आहेत. प्रियांकापूर्वी निकच्या आयुष्यात अनेक मुली आल्या होत्या. त्यापैकी अनेक जणीदेखील निकपेक्षा मोठ्या होत्या.
निकने केला खुलासा
अमेरिकन पॉप स्टार जगभरात लोकप्रिय आहे. या कलाकाराचे चाहते त्यासाठी क्रेझी आहेत. दरम्यान एका मुलाखतीमध्ये निकला एक प्रश्न विचारण्यात आला. निक त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलींना का डेट करतो हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर निकनेही खास उत्तर दिलं होते.
निकच्या मते, त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुली अधिक समजुतदार असतात. त्यांना काय हवंय हे ठाऊक असतं. त्यामुळे वयाने मोठ्या मुलींसोबत डेट करत असल्याचं निकने सांगितलं आहे.मुलीला डेट करण्यासाठी तिचं वय कधी माझ्यासाठी बंधन असू शकत नाही असे निक हसत म्हणाला होता. प्रियांका चोप्राच्या 'निक जोनास' बाबत 10 खास गोष्टी !
प्रियांका - निकचा साखरपुडा
मुंबईत प्रियांकाच्या राहत्या घरी निक आणि प्रियांकाचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या 'रोखा' सेरेमनीनंतर खास पार्टीमध्ये भारतातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लग्न ठरवताना वधू वराच्या वयात अंतर ठेवणं का गरजेचं?