प्रियांका चोप्राच्या 'निक जोनास' बाबत 10 खास गोष्टी !

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच मिसेस जोनास होणार आहे. 

Updated: Aug 19, 2018, 02:26 PM IST
प्रियांका चोप्राच्या 'निक जोनास' बाबत 10 खास गोष्टी !

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच मिसेस जोनास होणार आहे. शनिवारी ( 18 ऑगस्ट 2018) रोजी एका घरगुती कार्यक्रमामध्ये निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांचा साखरपुडा पार पडला. या 'रोखा' सेरेमनीनंतर अनेक सेलिब्रिटींनी प्रियांका आणि निकला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही निक आणि प्रियांकासोबतच त्यांच्या कुटुंबीयांनीही त्याच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.  

 

निक जोनास कोण  ?  

निक जोनासचा जन्म अमेरिकेत टेक्सास येथील डेल्लास शहरात झाला.

निक जोनास हा लोकप्रिय गायक, संगीतकार आणि अभिनेता आहे. सातव्या वर्षापासून निक जोनासच्या संगीतक्षेत्रातील कारकिर्दीतीला सुरूवात झाली. 

भाऊ जो, केविन सह निकने त्यांचा खास म्युझिक बॅन्ड बनवला. जगभरात हे जोनास त्रिकुट 'द जोनस ब्रदर्स' या नावाने एकत्र कार्यक्रम  करतात. 

निक 13 वर्षांचा असताना It's about time हा निकचा अल्बम डिस्नेवर लोकप्रिय ठरला. 

2014 साली बॅन्डपासून वेगळे होऊन निकने त्याचा स्वतंत्र अल्बम लॉन्च केला. 

Careful what you wish for या सिनेमात निकने काम केले आहे. अमेरिकन सीरीज क्वांटीकोच्या सेट्सवर प्रियांका आणि निकची भेट झाली. 

निक सुमारे 175 कोटी  रूपयांचा मालक आहे.  

2014 साली ब्रिटीश मासिक OK आणि 2015 साली अमेरिकन मासिक People's ने निकचा Sexiest Men Alive या किताबाने गौरव केला आहे. 

प्रियांका चोप्रा पूर्वी निकचे जगभरातील इतर अनेक मुलींसोबत रिलेशनशीपमध्ये होता. यामध्ये प्रसिद्ध अमेरिकन गायिका मायली सायरस, सेरेना गोमेझ अशा गायक, अभिनेत्रींचाही समावेश होता. 

निक 13 वर्षांचा असताना त्याला टाईप 1 डाएबेटीसचं निदान झालं. यानंतर त्याने 'चेंज फॉर चिल्ड्रन फाउंडेशन' ची निर्मिती करून या आजाराबाबत समाजात जनजागृती करण्याचं काम सुरू केलं आहे.