`ती` होती बिग बी- रेखा यांची शेवटची भेट, अखेर सत्य समोर
त्या भेटीनंतर कधीही एकत्र दिसली नाही इंडस्ट्रीची प्रसिद्ध जोडी...
मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत, जे आज एकत्र नाहीत, पण त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आज देखील चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अशाचं कपल पैकी एक म्हणजे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडचे हे प्रसिद्ध कलाकार एकमेकांच्या प्रेमात पूर्ण बुडाले होते. पण कुटुंबामुळे बिग बी रेखा यांच्यापासून कायमचे दूर झाले.
आता बिग बी त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहेत, तर दुसरीकडे रेखा आजही एकट्या आहेत. रेखा आणि अमिताभ यांनी दहा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. तेव्हा त्यांच्या जोडीला चहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं.
आज देखील त्यांच्या प्रेमाचे किस्से इंडस्ट्रीच्या प्रत्येक कोपऱ्यात गुंजत असतात. असाच एक किस्सा 'मुकद्दर का सिकंदर' चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटानंतर खुद्द अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत काम करण्यास नकार दिला होता.
ही गोष्ट जेव्हा रेखा यांना समजली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रेखा यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं. अमिताभ यांनी प्रत्येक निर्मात्याला मी रेखा यांच्यासोबत काम करणार नाही असं सांगितलं. पण बिग बींनी ही गोष्ट रेखा यांना स्वतः सांगितली नव्हाती.
त्यानंतर रेखा यांनी या गोष्टीची विचारणा बिग बींकडे केली. तेव्हा बिग बींनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. तेव्हा ही जोडी शेवटी ऑनस्क्रिन दिसली. त्यानंतर ही जोडी फक्त त्या 10 चित्रपटांसाठी मर्यादीत राहिली.
रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी 'दो अनजाने' चित्रपटांमध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले. त्यावेळी अमिताभ मोठे स्टार होते, तर रेखा हिंदी चित्रपटसृष्टीत नवीन होत्या.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवलेल्या रेखा यांनी 'दो अनजाने' चित्रपटातून पदार्पण केलं. चित्रपटात त्यांची जोडी इतकी हिट झाली की निर्मात्यांनी रेखा आणि बिग बींसोबत 9 चित्रपटांमध्ये काम केलं.