Rekha Birthday: बॉलिवूडमधील (Bollywood) 80 च्या दशकातील अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर रेखाचं नाव सर्वात वर येतं. ती एक यशस्वी अभिनेत्री तर आहेच पण तिचे सौंदर्यही अतुलनीय आहे. रेखा आज तिचा 68 वा वाढदिवस साजरा करणार आहे. वयाच्या या टप्प्यावरही तिचं सौंदर्य आजही अनेकांना घायाळ करतं. 1954 मध्ये चेन्नईमध्ये (Chennai) जन्मलेल्या रेखाचं संपूर्ण आयुष्य वादांनी वेढलेलं आहे. फिल्मी करिअरमध्ये (Film career) रेखाचं (Rekha) नाव अनेक लोकांशी जोडले गेले. त्याच्या अफेअरचे किस्से अनेकदा चर्चेत आले. महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी (Love story) ही आजही सगळ्यात हीट आहे. पण बिग बींशिवाय रेखा यांच्या आयुष्यात अजून कोण कोण होतं त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात...(Rekha Birthday and Bollywood actress Rekha love affairs nmp)


नवीन निश्चल-रेखा (Navin Nischol-Rekha)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत नवीन निश्चल मोहन सहगल यांचा 'सावन भादो' या चित्रपटादरम्यान पहिल्यांदा रेखा यांचं नाव कोणा अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होतं. हे नातं जास्त काळ टिकलं नाही. पण यानंतर बॉलिवूडमध्ये रेखा यांच्या नावासोबत अनेक अभिनेत्यांची नावं जोडल्या गेली. 


विश्वजीत चॅटर्जी-रेखा (Biswajeet Chatterjee-Rekha)


विश्वजीत चॅटर्जी ज्यांना त्यांच्या काळातील अतिशय देखणा अभिनेता म्हटलं जातं, त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. विश्वजीत आणि रेखा यांचा एक किस्सा आजही खूप प्रसिद्ध आहे. एका दृश्यादरम्यान वारंवार कट करूनही विश्वजीतने रेखा यांना किस करणं थांबवलं नव्हतं. 


जितेंद्र-रेखा (Jeetendra-Rekha)


रेखाचं नाव पहिल्यांदा सुपरस्टार जितेंद्रसोबत जोडलं गेलं. मात्र, याचदरम्यान त्यांनी शोभा कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र लोकांनी यासाठी रेखाला दोष दिला. नंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येणे बंद झाल्यात.


किरणकुमार-रेखा (Kiran Kumar-Rekha)


जीतेंद्रनंतर रेखाच्या आयुष्यात किरण कुमारचा प्रवेश झाला. पण हे नातं जितक्या लवकर सुरु झालं ते तितक्या लवकर संपलंदेखील. 



विनोद मेहरा-रेखा (Vinod Mehra-Rekha)


यानंतर रेखाचे नाव अभिनेते विनोद मेहरासोबत जोडले गेले. दोघांनी गुपचूप लग्न केल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर रेखा जेव्हा तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा विनोद मेहराच्या आईने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला घराबाहेर ढकलले. यानंतर तिने विनोद मेहरासोबतचे सर्व संबंध संपवले.


अमिताभ बच्चन - रेखा (Amitabh Bachchan-Rekha)


विनोद मेहरा यांच्यानंतर सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी रेखाच्या मनात घर केलं. दोघांनी लग्न केले नसले तरी त्यांची प्रेमकहाणी आजपर्यंत कोणीही विसरू शकले नाही. याच काळात अमिताभ यांचं लग्न झालं. पुढे रेखाला या नात्यातून माघार घ्यावी लागली.


मुकेश अग्रवाल-रेखा (Mukesh Aggarwal-Rekha)


जेव्हा अमिताभचे प्रेम रेखाच्या नशिबात नव्हतं, तेव्हा उद्योगपती मुकेश अग्रवाल यांनी त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला. मुकेश अग्रवाल हे दिल्लीचे मोठे उद्योगपती होते. त्यांची कंपनी हॉटलाइन स्वयंपाकघरातील वस्तू बनवायची. मुकेश यांना चित्रपटातील व्यक्तिरेखा खूप आवडत होत्या आणि ते चित्रपटातील कलाकारांना त्यांच्या पार्ट्यांमध्ये बोलावत असतं. प्रसिद्ध डिझायनर बिमा रमानी या मुकेश आणि रेखाच्या कॉमन फ्रेंड होत्या. रेखा अनेकदा त्यांना भेटायला जायची आणि इथेच त्यांची मुकेश भेट झाली.


संजय दत्त-रेखा (Sanjay dutt-Rekha)


रेखा आणि अभिनेता संजय दत्त यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप आल्या. 'जमीन आसमान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेम फुलले, असं म्हटलं जातं. मात्र, नंतर संजय दत्तनेही या नात्यावर खुलासा केला.


अक्षय कुमार - रेखा (Akshay Kumar-Rekha)


यानंतर रेखाचं नाव अक्षय कुमारसोबत जोडलं गेलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'खिलाडी का खिलाडी' या चित्रपटातून दोघांमधील जवळीक वाढली होती. मात्र, त्यावेळी अक्षय रवीना टंडनला डेट करत होता. रवीनाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती खूप संतापली होती.