मुंबई : रेखाने तिच्या करिअरमध्ये खूप यश मिळवले. मात्र, तिचा यशापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. जेव्हा रेखाला वयाच्या 13 व्या वर्षी घरच्यांचा आधार न घेता चित्रपटात काम करायला लावले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेखा तिच्या आईला नेहमी सांगायची की, तिने चित्रपटात काम करायचं नाही. त्याच वेळी, रेखाला 1969 मध्ये 'अंजना सफर' चित्रपटाची ऑफर आली तेव्हा रेखाच्या आईने तिला दक्षिण आफ्रिकेला जाण्याचे आमिष दाखवून या सिनेमात काम करण्यासाठी तयार केले.कारण चित्रपटाचे काही भाग तेथे शूट होणार होते.


दक्षिण आफ्रिकेचा अनुभव चांगला होता, पण त्यानंतर मुंबईतील शुटींगचा अनुभव रेखासाठी काही खास नव्हता. खरंतर रेखा त्यावेळी खूप गुबगुबीत होती. चित्रपटाच्या निर्मात्यांना तिच्या आईने विशेष सूचना दिल्या होत्या की तिला सतत खायला द्यावं.


 याशिवाय रेखाला मुंबईची भाषा समजण्यातही खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे तिला बऱ्याचदा संवाद साधायला जमायचा नाही.त्याचवेळी 'अंजना सफर' या चित्रपटात रेखाला त्यावेळचे प्रसिद्ध अभिनेते विश्वजीत यांच्यासोबत काम करायचे होते. या चित्रपटात एक किसिंग सीन शूट करण्यात येणार होता. रेखाला 


जेव्हा याबद्दल सांगण्यात आले तेव्हा ती घाबरली आणि तिने हा सीन करण्यास नकार दिला.मात्र, चित्रपटाच्या टीमचे मन वळवल्यानंतर रेखाने मोठ्या कष्टाने हा सीन करण्यास होकार दिला होता. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा या सीनचे चित्रीकरण सुरू झाले तेव्हा रेखा इतकी घाबरली 


होती की तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्यामुळे सीन्स पुन्हा पुन्हा शूट केला जात होता. त्यामुळे रेखा बेशुद्ध झाली होती.


एका किसिंग सीनमुळे हिरोईन हिंदी सिनेमात पहिल्यांदाच बेशुद्ध झाली. ही गोष्ट सगळीकडे आगीसारखी पसरली आणि रिलीजपूर्वीच चित्रपट आणि रेखा चर्चेत आले.