Rekha In Kamasutra : रेखाने `या` चित्रपटात शिकवले होते कामसूत्राचे धडे, देशात पहिल्यांदाच ठेवण्यात आला Ladies Special शो
25 Years Of Kamasutra-A Tale Of Love : रेखाच्या सर्वात बोल्ड आणि भारतातील धाडसी चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली. तरी आजही या चित्रपटाची चर्चा होते. 6 फेब्रुवारी 1998 ला हा चित्रपट भारतात रिलीज झाला होता त्यानंतर एकच खळबळ माजली होती.
Rekha Films : रेखाची सौंदर्याची जादू आजही चाहत्यांवर कायम आहे. भरजरी बनारसी साडी, केसात गजरा, भांगेत कुंकू आणि हातात बांगड्या असा रेखाचा एक काळी बोल्ड चित्रपट आला होता. त्यानंतर बाॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. गेल्या 50 वर्षांच्या चित्रपट कारर्किद हा रेखाचा सर्वात बोल्ड चित्रपट होता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण महिलांसाठी या चित्रपटाचा स्वतंत्र शो ठेवण्यात आला होता. आम्ही बोलतोय दिग्दर्शक मीरा नायर (Meera Nair) यांच्या कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह या चित्रपटाविषयी... 6 फेब्रुवारी 1998 ला हा चित्रपट भारतात रिलीज झाला आणि बॉलिवूडसह सर्वसामान्यांना जोरदार शॉक बसला. त्या काळात बॉलिवूडमध्ये एकपेक्षा एक फ्लॉप चित्रपट येतं होते. अशातच आंतरराष्ट्रीय निर्मात्यांचा हा चित्रपट आला आणि अख्खी इंडस्ट्री हलली...याच चित्रपटात रेखा यांनी रासदेवीची भूमिका केली. या चित्रपटात सोळाव्या शतकातील राजे आणि संस्थानांची कहाणी सांगण्यात आली होती. ज्यात नग्न दृश्यांमध्ये वातसायनच्या कामसूत्राचा ज्या प्रकारे समावेश करण्यात आला, त्यावरून त्यांची बरीच चर्चा झाली. (rekha played love guru 25 Years Of Kamasutra A Tale Of Love Ladies Special show was held for the first time entertainment marathi news)
सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री तरीदेखील..!
हा चित्रपट मुळात इंग्रजीत होता, त्याला हिंदी डब करण्यात आला होता. अशातच या चित्रपटात कामसूत्रसंबंधित इतके सीन होते की सेन्सॉर बोर्डाने बऱ्यापैकी कात्री लावली होती. पण तरीदेखल यात बरंच काही बाकी होतं. या चित्रपटात रेखाने लव्ह गुरूची भूमिका साकारली होती. आश्रमातील महिलांना ती पुरुषांवर कसं प्रेम करायचं ते शिकवते. या चित्रपटात रेखा बोल्ड सीन्स दिले होतं अशी त्याकाळात चर्चा रंगली होती. पण चित्रपट रिलीज झाल्यावर तसं त्यात फार काही दिसलं नाही. या चित्रपटातील गाणेदेखील खूप प्रसिद्ध झाले होते. रेखाचा हा पहिला इंग्रजी चित्रपट होता. पण आजपर्यंत एवढा धाडसी चित्रपट पडद्यावर प्रदर्शित झाला नाही. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येक वयोगटातील लोकांनी गर्दी केली होती. पण महिला मात्र या चित्रपटापासून दूर होत्या.
महिलांसाठी पहिल्यांदाच असा निर्णय
महिलांमध्येही या चित्रपटाविषय खूप उत्सुकता होती. पण त्या काळात घरातील इतर पुरुषांसोबत बसून हा चित्रपट पाहणं महिलांसाठी कठीण होता. त्यामुळे महिला हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरपर्यंत पोहोच नव्हती. अशातच मुंबईचे वितरक बाळकृष्ण श्रॉफ यांनी एक अजून धाडसी निर्णय घेतला. ज्या निर्णयाची देशभरात चर्चा झाली होती. कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह फॉर लेडीजचा वेगळा शो ठेवण्यात आला. मुंबई आणि उपनगरात दिवसाला सुमारे 10 ते 12 चित्रपटगृहांमध्ये फक्त महिलांसाठी चित्रपटाचे तीन वाजता शो आयोजित केले जात होते. या शक्कलमुळे वितरकांची चांगली कमाई झाली. एवढंच नाही तर इतर मोठ्या शहरांमध्ये महिलांसाठी स्वंतत्र शो ठेवण्यात आला.