12 वर्षांनंतर शिल्पा शेट्टीचं बॉलिवूडमध्ये पुनरागमन
`हंगामा 2` सिनेमातून पुनरागमन
मुंबई : तब्बल 12 वर्षे सिनेसृष्टीपासून दूर राहणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुनरागमन करत आहे. यापूर्वी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून शिल्पाच्या चाहत्यांनी सिनेमात कधी काम करणार? असा सवाल विचारला आहे.
25 वर्षापूर्वीच्या गाण्यावर शिल्पा शेट्टी पुन्हा थिरकणार आहे. 'चुरा के दिल मेरा...' या गाण्यावर शिल्पा थिरकणार असून या गाण्यामार्फत ती 12 वर्षांनी पुनरागमन करत आहे. एका सिनेमाकरता या गाण्याचं रिक्रिएशन केलं जाणार आहे.
'हंगामा 2' सिनेमाकरता 'चुरा के दिल मेरा' हे गाणं रिक्रिएट केलं जाणार आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या 'मैं खिलाडी तू अनाडी' या सिनेमातील हे गाणं आहे. सुपरहिट गाण्यांपैकी एक असं हे गाणं आहे. आजही या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती आहे.
या सिनेमाच्या अगोदर प्रसिध्द सिने अभिनेत्री शिल्पा आणि शमिता या दोघींनी शिर्डीत येऊन साईसमाधीचं दर्शन घेतलं. बाबांचे धन्यवाद मानायला शिर्डीला येत असल्याचं यावेळी शिल्पा शेट्टीने सांगितलं. त्याच्यासोबत राजकुंद्रा , त्यांची आई आणि शिल्पाची आईही बरोबर होती. साई समाधी मंदीरात जाऊन या सर्वांनी साईची पाद्य पुजा केली त्या नंतर साई संस्थानच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी उभयतांचा सत्कार केला.
दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना शिल्पाने बारा वर्षानंत्तर 'निक्कम्मा' आणि 'हंगामा 2' या चित्रपटात काम करतेय. तसंच सुपर डान्सर मध्येही जजची भूमिका निभावणार असल्याचंही तिने सांगितलं..या वर्षाच्या सुरुवातीला असलेल्या बिझी शेड्यूलमुळे साईंचे आभार मानण्यासाठी आल्याचं तिने सांगितलं. विशेष म्हणजे २५ वर्षानंतर 'चुराके दिल मेरा' या गाण्यावर शिल्पा पुन्हा थिरकणार आहे