मुंबई : 'इंडियन आयडॉल' फेम गायिका रेणू नागरला बॉयफ्रेंडच्या आत्महत्येनंतर ICUमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. राणूच्या विवाहीत बॉयफ्रेंडने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राणू नागरच्या बॉयफ्रेंडचे नाव रवी नट असे होते. विवाहीत आणि तीन मुलांचा पिता असणाऱ्या रवी नटसोबत राणूचे प्रेमसंबंध होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉयफ्रेंडच्या आत्महत्येबद्दल माहिती कळताच राणूला मोठा धक्का बसला. त्यानंतर राणूला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे.  रवीने विषारी पदार्थ खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


राणूच्या वडिलांना आपल्या मुलीचे आणि रवीचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे राणूने रवीसोबत महिन्याभरापूर्वी घर सोडले होते. त्यावेळी राणूच्या वडिलांनी पोलीस स्थानकात आपल्या मुलीला पळवून नेण्याचा रवीवर गुन्हा देखील दाखल केला. मात्र राणूने जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी  रवीला सोडले. त्यानंतर ते अल्वरला परतले होते.