Renukaswamy Murder Case Movie on Darshan : कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपला रेणुकास्वामी मर्डर प्रकरणावर आता एक चित्रपट बनवण्यात येणार आहे. ज्याच्या नावाववरून निर्मात्यांमध्ये चर्चा सुरु आहे. या धक्कादायक प्रकरणावर चित्रपट करण्यासाठी आतुर आहेत निर्माते.  'डी-गॅंग' आणि 'कैदी नंबर 6106' सारखी नावं घेऊन ते फिल्म चेम्बर (एसोसिएशन) ला पोहोचले. पण एसोसिएशन पोहोचले आहेत. एसोसिएशनकडून त्यांना यासाठी नकार देण्यात आला. कारण या प्रकरणावर अजूनही निकाल लागलेला नाही. 


एसोसिएशनकडून अशी प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे रेणुकास्वामीच्या कथित हत्या प्रकरणात दर्शन तुरुंगात आहे. तर दुसरीकडे निर्मात्यांना या सगळ्या प्रकरणात त्यांचं टायटल रजिस्टर करायचं आहे. 'टाइम्स ऑफ इंडियानं' दावा केला की चित्रपट निर्मात्यांना नकार देण्यात आला आहे, कारण हे प्रकरण अजून कोर्टात सुरु आहे. 


कोणती नावं निवडलीत?


दर्शन हत्याकांड प्रकरणात जे निर्माते चित्रपट करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी डी-गॅंग, Pattanagere Shed आणि कैदी नंबर 6106 अशी नावं सुचवली आहेत. याठी त्यांनी मंजूरी देखील मागितली आहे. डी-गॅंग हा दर्शनचं टोपण नाव डी-बॉसमधून घेण्यात आलं आहे. पट्टनेगरे शेड ही जागा आहे, जिथे कथितपणे ही हत्या झाली होती. त्याशिवाय कैदी नंबर 6106 परप्पना अग्रहारा तुरुंगात दर्शनला देण्यात आलेला कैदी नंबर आहे. 


11 जून रोजी झाली अटक


दर्शन, पवित्रा गौडा आणि त्यांच्या साथिदारांना 11 जून रोजी अटक करण्यात आली होती. त्या सगळ्यांना रेणुकास्वामी कथित हत्ये प्रकरणात 4 जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे. कामाक्षीपाल्या पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


हेही वाचा : चार दिवसात ‘कल्कि 2898 एडी’ नं केली 300 कोटींची कमाई, हिंदीत कमावले इतके कोटी


रेणुकास्वामी हत्ये प्रकरणात माहिती समोर आली होती की रेणुकास्वामीचा शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या शरिरावर गरम लोखंडी रॉडने चटके दिल्याचे निशाण दिसले होते. डॉक्टरांनी सांगितलं की, त्याचं नाक, जीभ कापण्यात आली होती. तसंच जबडाही तोडण्यात आला होता. त्याच्या शरिरातील जवळपास सर्वच हाडं मोडली होती. त्याच्या खोपडीला फ्रॅक्चर होतं. त्याच्या शरीरावर 15 जखमांच्या खुणा मिळाल्या, रेणुकास्वामीनं कथितपणे पवित्रा गौडाला अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवले होते, ज्यानंतर दर्शननं त्याला चित्रदुर्ग ते बंगळुरु बोलावलं.  यामुळेच नाराज झालेल्या दर्शनने रेणुकास्वामीच्या हत्येची सुपारी दिली.