मुंबई : बॉलिवूडमधील मेल आणि फीमेल कलाकारांच्या फीमध्ये खूप फरक आहे आणि हा मुद्दा अनेकदा उपस्थितही केला जातो. बर्‍याच अभिनेत्री अशाच फिपोटी या बद्दल बोलक्या झाल्या आहेत. आता हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने हा मुद्दा सार्वजनिकपणे उपस्थित केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तापसी पन्नू तिच्या स्पष्टवादी स्वभावामुळे ओळखली जाते. नुकत्याच एका मुलाखतीत, तापसी पन्नूने नायक आणि नायिका यांच्यात आर्थिक असमानतेच्या मुद्दयावर आपली भूमिका मांडली आहे. तिने मुलाखतीत म्हटलं की, जर एखादी महिला कलाकार फी वाढवण्यास सांगत असेल तर लोक हे स्वीकारण्यास नकार देतात आणि त्याला अवघड म्हणतात.


तापसी पुढे म्हणते, पण जेव्हा एखादा पुरुष कलाकार फी वाढवण्यास सांगतो तेव्हा ते त्यांचं यश मानलं जातं. ती म्हणाली, "जर एखाद्या महिला अभिनेत्रीने जास्त फी मागितली तर असं म्हटलं जात की, ते अवघड आणि समस्याप्रधान आहे आणि जर पुरुष अभिनेताने जास्त पैसे मागितले तर तो सक्सेसफुल मानलं जातं."


पुरुष अभिनेत्याची फी पाचपट जास्त
तापसी पन्नू पुढे म्हणाली, "फरक हा आहे की, माझ्याबरोबर माझ्या कारकीर्दीची सुरुवात करणारा माणूस आज माझ्यापेक्षा तीन ते पाच पट अधिक फी आकारतो. आणि जसजसे आपण एका मोठ्या स्टारच्या श्रेणीत येत आहोत, तसतसा हा फरक वाढत आहे."


महिला लीड चित्रपटांसाठी बजेटचं संघर्ष
तापसी पन्नू पुढे म्हणाली, "आजही आम्ही बजेटशी झुंज देत आहोत. प्रत्येकजण ऐकतो की ईथे एक महिला लीड फिल्म आहे, त्यामुळे त्याचं बजेट कमी करावं लागेल आणि हे कारण म्हणजे आपल्या पुरुष कलाकारांच्या तुलनेत आमचा परतावा नेहमीच अन्यायकारक असतो. प्रेक्षक हे त्यामागील एक मोठं कारण आहे."