Rhea Chakraborty : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही 2020 मध्ये सुशांत सिंह राजपुतच्या निधनानंतर आणि ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आली होती. ड्रग्स केसमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमध्ये रिया चक्रवर्तीला 28 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. रियासोबत तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला देखील तुरुंगवास झाला होता. याविषयी रिया चक्रवर्तीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे की जेव्हा तिला सुशांत सिंह राजपुत ड्रग्स प्रकरणात अटक झाली होती. तेव्हा तिच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रियानं सांगितलं की जेव्हा ती तुरुंगातून बाहेर आले तेव्हा तिला तिच्या आई-वडिलांचं आणि त्यांच्या मित्रांचं वाढलेलं वजन पाहून धक्का बसला होता. तिला वाटलं की ती आणि तिचा भाऊ तुरुंगात गेल्यामुळे कुटुंबाचं आणि मित्रांचं खाण्या-पिण्यावर लक्ष नसेल, पण जेव्हा ती परत आली तेव्हा तिला काही तरी वेगळंच पाहायला मिळालं. 


खरंतर, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांच्या आई-वडिलांची काळजी घेतली. अशात रियाच्या आई-वडिलांनी नीट जेवावं यासाठी माहौरला लाइट करण्यासाठी वाईन वगैरे प्यायचे. 'ह्युमंस ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीनं खुलासा केला की 'जेव्हा मी तुरुंगात होती तेव्हा माझे अनेक मित्र-मैत्रिणी माझ्या वडिलांसोबत मद्यपान करायचे आणि त्यांच्यासोबतच रोज रात्री जेवायचे.'


रिया चक्रवर्तीनं पुढे सांगितलं की 'जेव्हा मी बाहेर आले, तेव्हा मी म्हटलं की तुमचं इतकं वजन कसं वाढलं? बास्टर्ड (मित्रांना), मी तिथे तुरुंगात होते आणि तुम्ही लोकं इथे जेवत होतात, वजन वाढवत आहात.' त्यावर ते म्हणाले, 'नाही बाबा. आम्ही फक्त काका आणि काकूंनी काही खायला हवं यासाठी प्रयत्न करत होतो, म्हणजे त्यांना थोडं नॉर्मल असल्याचं वाटेल' आणि मी म्हटलं की 'वाव.'


हेही वाचा : कलाविश्वातील लैंगिक शोषणाच्या घटनांवर रजनीकांत यांची आश्चर्यकारक प्रतिक्रिया म्हणाले...


रियानं पुढे सांगितलं की तिला तिच्या वाईट काळात सगळ्यात जास्त पाठिंबा हा तिच्या मित्रांनी दिला आहे. ते तिच्या पाठीशी उभे होते. त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फरहान अख्तरची बायको शिबानी दांडेकरनं. रियानं सांगितलं की 'संपूर्ण जग हे तिच्या विरोधात होता, फक्त शिबानी तिच्यासोबत होती.' ती नेहमीच तिच्यासाठी उपस्थित होती.