Rajinikanth on Hema Committee : मल्याळम चित्रपटसृष्टीत हेमा कमेटीच्या रिपोर्टनंतर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविषयी सांगितलं. आता अनेक अभिनेत्रींवर गंभीर आरोप लगावण्यात आले आहेत. मोहनलालपासून ममूटीसारख्या अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी या प्रकरणात दिलेल्या प्रतिक्रियेनं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
तमिळ चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता रजनीकांत यांनी कन्नड, तेलगू, मल्याळम, बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीत खूप काम केलं. रविवारी चेन्नई विमानतळावर पोहोचलेल्या रजनीकांत यांना पाहताच पापाराझी त्यांच्या मागे फोटो काढण्यासाठी फिरू लागले. त्यावेळी एका पत्रकारानं त्यांच्या गाडीजवळ येऊन त्यांचा आगामी चित्रपट 'कूली' आणि इतर अनेक मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी रजनीकांत यांनी अनेक गोष्टींवर मनमोकळेपणानं बोलले, मात्र जेव्हा हेमा समितीच्या रिपोर्टविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना काहीच माहित नव्हतं.
पोलीमर न्यूजद्वारा शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओच्या रिपोर्टमध्ये विचारण्यात आलं की काय तमिळ चित्रपटसृष्टीत होत असलेल्या लैंगिक शोषणाचा तपास करण्यासाठी समिती बनवण्यात आली पाहिले. तर रजनीकांत यांनी गोंधळल्यासारखे चेहऱ्यावर हावभाव दिले आणि परत प्रश्न विचारा असं सांगितलं. जेव्हा त्यांनी सांगितलं की 'हेमा समिती, मल्याळम...' त्यावर हसत रजनीकांत यांनी उत्तर दिलं की 'मला नाही माहित... मला याविषयी काही माहित नाही. मला माफ करा.' त्यानंतर त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मग पुढे निघून गेले.
दरम्यान, समांथा रुथ प्रभू आणि वीमेन इन सिनेमा कलेक्टिव (WCC) मध्ये नुकत्याच तेलंगना सरकारशी तेलगू चित्रपटसृष्टीवर अशा प्रकारचीच रिपोर्ट पब्लिश करण्याची विनंती केली. WCC नं दोन वर्षांआधी सरकारला त्यांची रिपोर्ट दिली. पण सरकारनं या सगळ्या विनंतीवर उत्तर दिलेलं नाही.
हेही वाचा : शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सप्टेंबरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार 'हे' चित्रपट
रजनीकांत यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर रजनीकांत यांना Vettaiyan मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्यांच्याकडे 'कूली' हा चित्रपट आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सगळीकडे आता हेमा कमेटीच्या रिपोर्टचीच चर्चा आहे.