मुंबई : गेल्यावर्षी #Metoo मुळे चर्चेत आलेल्या महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाचा अनुभव जगासमोर मांडला. यावेळी अनेक बॉलिवूड महिलांनी देखील काही अनुभव शेअर केले. पण यामुळे अनेक मोठ्या कलाकारांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं गेलं. एवढंच नव्हे तर अनेक लोकप्रिय कलाकारांना काम मिळणं देखील बंद झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी जरीन खान आणि एली अबरामने कास्टिंग काऊचवर मोठा खुलासा करून सगळ्यांना धक्का दिला. आता अभिनेत्री रिचा चड्डाने आपल्यासोबत झालेल्या घटनेचा खळबळजनक खुलासा केला आहे. 


रिचा चड्डाने कास्टिंग काऊचवर एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. रिचाने सांगितलं की, मला अनेकदा लोकांच्या खाणाखुणा समजत नसतं. मी त्यावेळी खूप तरूण होती. तसेच माझी समज देखील कमी होती. एके दिवशी, एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्याने सांगितलं की, आपल्याला एकत्र डिनर करायला हवं. 


रिचा पुढे म्हणाली की, त्यावेळी मला त्याला काय सांगायचं होतं हे कळलं नाही. मी त्याला उत्तर दिलं की, माझं डिनर झालं आहे. तेव्हा तो माणूस आणखी जवळ येऊन मला हात लावू लागला. तेव्हा मला त्याच्या बोलण्याचा अंदाज आला की, त्याला नेमकं काय सांगायचं होतं. 


हे फक्त एकदाच झालं असं नाही. बॉलिवूडमध्ये मी अभिनेत्री म्हणून नावा रूपाला आले तेव्हा देखील माझ्यासोबत असं वागण्याचा विचार केला गेला. त्याला मी विरोध केला म्हणून मी तो प्रोजेक्ट गमावला आहे. पण माझ्यासाठी ही गोष्ट महत्वाची नाही. 


एवढंच नव्हे तर पुढे रिचा म्हणाली की, तिला एकदा हृतिक रोशनच्या आईची भूमिका ऑफर करण्याती आली होती. तेव्हा मी खूप नाराज झाले होते. त्यानंतर तीने या कास्टिंग दिग्दर्शकाला काहीच विचारलं नाही.