Riddhima Kapoor on Rishi Kapoor's Last Call : बॉलिवूडचे लोकप्रिय दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनाला आता 4 वर्ष होऊन गेली आहेत. या सगळ्यातून त्यांचं कुटुंब अजूनही बाहेर पडू शकलेलं नाही. ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा तर त्यांच्या अंत्यविधीला देखील पोहोचू शकली नव्हती. इतकंच नाही तर तिनं ऋषी कपूर यांचा शेवटचा कॉल देखील मिस केला होता. रिद्धिमाला या गोष्टीची आजपर्यंत खंत आहे आणि तिनं तो मिस कॉल सेव्ह करुन ठेवला आहे. याविषयी बोलताना तिनं सांगितलं की तिच्या कुटुंबासाठी हा सगळ्यात वाईट टप्पा होता. तरी सुद्धा ते उदास दिसत नाही त्यामुळे लोक त्यांच्या कुटुंबाला ट्रोल करताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिद्धिमानं नुकतीच ही मुलाखत Galatta Plus ला दिली होती. त्यांनी सांगितलं की जेव्हा त्यांचं निधन झालं त्याच्या दोन दिवस आधी त्यांनी मला कॉल केला होता. त्यांचा तो कॉल मिस कॉलमध्ये गेला होता. तो आजही माझ्या फोनमध्ये आहे. तो त्यांचा अखेरचा कॉल होता. काश मी तो कॉल उचलला असता. त्यानंतर ते बोलू शकले नाही, कारण ते रुग्णालयात होते आणि तो मिस कॉल मी स्क्रीनशॉट घेऊन सेव्ह करुन ठेवला आहे. कारण त्यावेळी त्यांनी माझ्याशी बोलण्यासाठी शेवटचा कॉल केला होता. त्यानंतर मी त्यांना फोन केला पण ते बोलू शकत नव्हते. 



ऋषी कपूर यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंब हे दुखी दिसत नाही म्हणून ट्रोल होत होतं. रिद्धिमानं यावर देखील वक्तव्य केलं आहे. रिद्धिमा म्हणाली, हा त्या सगळ्यांच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता. लोकांना कळत नव्हतं की त्या सगळ्यांची काय परिस्थिती आहे. तर त्या सगळ्यांना एकमेकांसोबत एकमेकांना पाठिंबा देत उभं रहायचं होतं. जर नीतू कपूर या दुखी दिसल्या तर रणबीर आणि रिद्धिमा कपूर यांची चिंता वाढायची. त्यामुळे त्या काहीही चेहऱ्यावर दाखवायच्या नाही. 


हेही वाचा : सलग 25 फ्लॉपनंतर अक्षय कुमारच्या बुडत्या करिअरला सावरणार का प्रियदर्शन? पुन्हा एकत्र


ऋषी कपूर यांचे निधन 30 एप्रिल रोजी झाले. त्यावेळी कोरोनामुळे लॉकडाऊन झाला होता. रिद्धिमा तिच्या वडिलांच्या अंत्यविधीला पोहोचू शकत नव्हती. आलिया भट्टनं तिला व्हिडीओ कॉलवर ऋषी कपूर यांचे शेवटचे दर्शन दिले.