Salman Khan And Arun Jaitley : सेलिब्रिटी म्हटलं तर त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांचं लक्ष असतं. त्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेता सलमान खान असेल तर, काही सांगायलाच नको. भाईजानच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. त्यामुळे सलमानचा कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच अभिनेत्या आगामी सिनेमा चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. सध्या सलमानच्या बहुप्रतीक्षीत सिनेमा 'टायगर 3' बद्दल चर्चा रंगत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान स्टारर टायगर सिनेमाचे पहिले दोन भाग चाहत्यांच्या पसंतीस पडले. त्यामुळे 'टायगर 3' मध्ये काय खास असेल याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 'टायगर 3' सिनेमाबाबत रोज नवीन अपडेट आता समोर येत आहेत. (ridhi dogra instagram)


मिळालेल्या माहितीनुसार, 'टायगर 3'  सिनेमात भाजप दिवंगत नेते अरूण जेटली यांची भाची आणि अभिनेत्री रिद्धी डोगरा  (Ridhi Dogra) मुख्य भूमिकेत दिसणार आहे (ridhi dogra and arun jaitley). या सिनेमातून रिद्धी आणि सलमान पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सिनेमात रिद्धी आणि सलमान यांच्या काय कनेक्शन असेल हे अद्याप कळालेलं नाही. (raqesh bapat and ridhi dogra)



टीव्ही क्विन रिद्धी डोगरा 
चित्रपटांमध्ये यश मिळत नसल्याचं लक्षात येताचं त्याने मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. त्याने 'सात फेरे: सलोनी का सफर', 'मर्यादा: लेकिन कब तक?', 'कुबूल है', 'बहू हमारी रजनीकांत' यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली.  'मर्यादा: लेकिन कब तक?' मालिकेतून अभिनेत्रीला एक वेगळी ओळख मिळाली.