कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन, इथं होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कार! महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इथेच पडतो

Maharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस याच गावात पडतो. हे गाव कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.   

Jun 28, 2024, 23:19 PM IST

Amboli rain : यंदा महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती आशादायी असल्याचं भाकित हवामान विभागानं वर्तवलंय. सध्याची परिस्थिती मान्सूनच्या दृष्टीने चांगली असून, दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल असं हवामान विभागानं म्हंटलंय. कोकणातील या गावात सर्वात जास्त पाऊस पडतो. 

1/7

डोंगर दऱ्यांनी संपन्न असलेल्या महाराष्ट्राचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून दिसते. पावसाळ्यात कोकणातील या गावाला भेट देणे म्हणजे स्वर्ग सुखचं. 

2/7

उंचावरून कोसळणारे पांढराशुभ्र धबधबे, धुकं आणि पावसामुळे इथलं वातावरण आलाहदायक बनते. यामुळे अनेक पर्यटक पावसाळ्यात येथे जाण्याचा बेत आखतात. 

3/7

आंबोली घाटातील सनसेट पॉइंट आणि महादेव पॉइंटवरून ढगांची गर्दी पहायला मिळतो. 

4/7

नभ उतरू आलं....याची प्रचिती पावसाळ्यात आंबोली घाटात पहायला मिळतेय. फेसाळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. 

5/7

  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीपासून 30 किमी अंतरावर आंबोली आहे. आंबोली घाट हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.    

6/7

आंबोली हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.  हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. 

7/7

 महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावात पडतो.  म्हणूनच आंबोली हे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते.