टेलिव्हिजन विश्वातील आणखी एक जोडपं होतय विभक्त
टेलिव्हिजन क्षेत्रातील आणखी एक जोडपं घटस्फोट घेत आहेत. कहानी घर घर की या मालिकेत बहीण-भावाची भूमिका साकारलेले रिंकू आणि किरण करमरकर वेगळे होतायत.
मुंबई : टेलिव्हिजन क्षेत्रातील आणखी एक जोडपं घटस्फोट घेत आहेत. कहानी घर घर की या मालिकेत बहीण-भावाची भूमिका साकारलेले रिंकू आणि किरण करमरकर वेगळे होतायत.
बॉम्बे टाईम्समधील रिपोर्टनुसार, लवकरच हे जोडपं घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहेत. रिंकू आणि किरणच्या लग्नाला १५ वर्षे झाली. मात्र या दोघांनी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या वर्षभरापासून ते वेगळे राहतायत. त्यांच्यात सुरु असलेल्या मतभेदांमुळे या दोघांनी हा निर्णय घेतलाय.
किरण आणि रिंकू पहिल्यांदा कहानी घर घर की च्या सेटवर भेटले होते. याच सेटवर त्यांचे सूत जुळले होते.