मुंबई : सैराटमधील आपल्या भूमिकेनं प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरूचा आता नवा सिनेमा येतोय. स्वत: रिंकूने आपल्या सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवा रंग प्रेमाचा असं या चित्रपटाचं नाव आहे. खुशबू सिन्हा या चित्रपटाच्या दिर्गर्शिका असतील. त्यांचा हा पहिलाच चित्रपट असल्याचं कळतंय. याशिवाय समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव हे या चित्रपटाचे निर्माते असतील.


या सिनेमात रिंकूसोबतच मकरंद देशपांडेही मुख्य भूमिका साकारणार आहेत. शिवाय विशाल आनंद हा या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सिनेसृष्टीत पदार्पण करतोय.


या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र हा सिनेमा कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाही, तर थिएटरमध्येच येणार आहे. या सिनेमाबाबत पोस्ट टाकताना रिंकूने म्हटलंय,


खरा जबाबदार


तितकाच खबरदार


आठवा रंग प्रेमाचा


देखणा-रूबाबदार



 


सैराट या चित्रपटातून रिंकू राजगुरूनं अभिनय क्षेत्रात आणि मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेलं. सैराट सिनेमाने बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कमाई केलीच, पण त्यातील आर्ची ही भूमिका रिंकूने इतकी खुबीने निभावली, की ती प्रत्येकाच्याच मनात घर करून बसली.


त्यानंतर रिंकूचा कागर हा ही सिनेमा आला. याशिवाय Hundred या सिरीजमध्येही रिंकूने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तासोबत काम केलेलं. आता आठवा रंग प्रेमाचा हा फिल्ममधून रिंकू कोणती भूमिका साकारतेय, याचीच तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.