तो अचानक आर्चीच्या घरी आला...; रिंकु राजगुरुनं सांगितला `तो` भयानक अनुभव
रिंकुनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
मुंबई : 'झी मराठी’वर असलेला ‘बस बाई बस’ (Bas Bai Bas) हा कार्यक्रमचा लाखो प्रेक्षक आहेत. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी कार्यक्रमात लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकु राजगुरुनं (Rinku Rajguru) हजेरी लावली होती. यावेळी रिंकुन तिला आलेला चाहत्याचा एक भयानक अनुभव सांगितला. (Rinku Rajguru At Bas Bai Bas Show)
आणखी वाचा : उर्वशी रौतेलाच्या 'या' ड्रेसच्या किंमतीत, तुमचं संपूर्ण कुटूंब करु शकेल Europe Trip
रिंकुला 2016 साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ (Sairat) या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिला चाहत्याचा कोणता भयानक अनुभव आला का असा सवाल सुबोध भावेनं केला. यावर उत्तर देत 'आपण अनेक कार्यक्रमांना जातो. चाहत्यांबरोबर हात मिळवतो. अशाच एका कार्यक्रमाला मी गेले होते, त्यावेळी मी एका चाहत्याला बघून सहज हात दाखवला. तो कोण आहे हे मला माहितही नव्हतं. एक दिवस तो अचानक माझ्या घरी आला आणि माझ्या आई-बाबांना म्हणाला मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तिने माझ्या डोळ्यात बघितलं आहे. ती रुक्मिणीचा अवतार आहे. मागच्या जन्मी मीही देव होतो. तर या जन्मी तुम्ही आमचं लग्न लावून द्या,' असं रिंकु म्हणाली. (Rinku Rajguru Talk About Worst Fan Moment In Bas Bai Bas Show On Zee Marathi Subodh Bhave )
आणखी वाचा : नातीची मनधरणी कशी करतात आजोबा अमिताभ बच्चन...!
आणखी वाचा : 'हा मुलगा मोठा होऊन....', Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर
पुढे याविषयी सांगताना रिंकु म्हणाली,'एवढंच नाही तर त्यानंतर तो अनेकदा माझ्या घरी आला. एकदा मी परिक्षेसाठी गेले होते. माझा पेपर संपल्यानंतर मी बाहेर आले आणि पाहते तर तो माझ्यासमोर पैशांनी भरलेली पिशवी घेऊन उभा होता. हे फारच भीतीदायक होतं. त्यानं मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप त्रास दिला. शेवटी आम्हाला पोलिसांत तक्रार करावी लागली.'