'हा मुलगा मोठा होऊन....', Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर

सोनमचा मुलगा मोठा होऊन काय करणार, पाहा

Updated: Sep 23, 2022, 05:10 PM IST
'हा मुलगा मोठा होऊन....', Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनमनं नुकताच तिच्या मुलाला जन्म दिला आहे.(Sonam Kapoor Gave Birth To A Boy) सोनमनं तिच्या मुलाचं नाव वायु-कपूर आहूजा (Vayu Kapoor Ahuja) असं ठेवलं आहे. सोनमनं नुकतीच पोस्ट शेअर करत तिच्या बाळाचं नाव जाहीर केलं आहे. त्यानंतर बॉलिवूडमधील लोकप्रिय ज्योतिषी संजय जुमानी यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. कपूरांच्या घरी छोटेखानी नामकरण सोहळाही पार पडला यावेळीच त्यांचं पाचारण करण्यात आलं आहे. तेव्हाच त्यांनी सोनमच्या मुलाविषयी ही भविष्यवाणी केल्याचं समोर आलं आहे. (Sonam Kapoor's Son's Future Prediction)'

आणखी वाचा : Deepika Padukone ला पाहताच Urvashi Rautela चं विचित्र कृत्य, पाहा Photo

रिपोर्ट्नुसार अशी माहिती समोर आली आहे की सोनम आणि आनंद त्यांच्या मुलासाठी तीन नावं शोधून ठेवली होती. पण कोणत्या नावापुढे दोन्ही आडनावं चांगली वाटतील हे ते पाहत होते. पण, संजय जुमानी यांनी वाजु हे नाव सांगितलं तेव्हा सोनम आणि आनंदनंही तेच नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. 

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : राखीशी लग्न करण्यावर बॉयफ्रेंड आदिलचा नकार? जाणून घ्या प्रकरण

जुमानी यांनी नुकतीच ईटाईम्सला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, 'मुलाचं नाव काय असावं याविषयी सोनमनं माझ्या निर्णयावर विश्वास ठेवत शिक्कामोर्तब केला. कारण आमची खूप आधीपासूनची ओळख आहे. सोनमची आई सुनिता कपूर या आमच्या फॅमिली फ्रेंड आहेत. याआधी एकता कपूरच्या मुलाच्या नामकरण सोहळ्याला मी गेलो होतो. एकताही माझी खूप जुनी क्लाएंट आहे. तिच्या मुलाचं नाव काही दिवसांपूर्वी रवी कपूर असे बदलून ठेवण्यात आले आहे.'( sanjay b jumaani prediction about sonam kapoor s vayu what he will do in future )

आणखी वाचा : Samudrik Shastra: शरीराच्या या भागावरील तीळ ठरतो शुभ, लक्ष्मी आणि कुबेराची असते कृपा

पुढे जुमानी म्हणाले, 'प्रत्येक आई-वडीलांना नामकरण विधीपासूनच वाटतं की आपल्या बाळाचं पुढे सगळं चांगलं व्हावं. त्यामुळे तेव्हाच काही पूजा-विधी केल्या जातात, म्हणजे एक सकारात्मक सुरुवात होते त्या बाळाच्या आयुष्याची. अगदी त्याच्या शिक्षणापासून ते पुढच्या करिअरपर्यंत सगळ्याचा विचार तेव्हा केला जातो.' पुढे जुमानी यांनी वायू कपूर आहुजाविषयी भविष्यवाणी देखील केली. 'वायू हा मोठा होऊन बॉलिवूडमध्ये एण्ट्री करेल आणि तो एक रोमॅन्टिक त्यासोबत क्रिएटिव्ह मुलगा असेल.'