नवी दिल्ली : साऊथची अभिनेत्री राय लक्ष्मी सध्या भलतीच चर्चेत आली आहे. 'जुली २' या आपल्या आगामी चित्रपटातून लक्ष्मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच 'जुली २'चे गाणेही रिलीज झाले. विशेष म्हणजे रिलीज होताच हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जुली २' च्या माध्यमातून राय लक्ष्मी बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. हा चित्रपट २००४मध्ये आलेल्या नेहा धुपियाच्या 'जुली' या चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटाचे टायटल ट्रॅक असलेले गाणे नुकतेच लॉंच झाले. यात लक्ष्मीचा हटके अंदाज पहायला मिळत आहे. हा चित्रपट दीपक शिवदासिनीने दिग्दर्शित केला आहे.



दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहिल्यावर या चित्रपटाचे कथानक लक्ष्मीच्या भूमिकेभोवतीच फिरत असल्याचे लक्षात येते. या चित्रपटाच्या पहिल्या भागात नेहा धूपिया आणि प्रियांशू चटर्जी प्रमुख भुमिकेत दिसले होते. २००४ मध्ये आलेला हा चित्रपट पहलाज निहलानी यांनी दिग्दर्शीत केला होता. पहलाज निहलानी हे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना पदावरून हटविण्यात आले.