Rishi Kapoor- Dawood Ibrahim : बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला - ऋषी कपूर अनसेन्सॉर्ड’ (Khullam Khulla: Rishi Kapoor Uncensored) या आत्मचरित्रामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्यांची भेट, तसेच एकेकाळी त्यांच्या आयुष्यात आलेल्या नैराश्याबद्दलही भाष्य केले आहे. तसेच ऋषी कपूर आणि दाऊद यांची एकदा नाही तर दोनदा भेट झाल्याची ही त्यांनी सांगितले.  


खुद्द दाऊदने ऋषी कपूरला घरी बोलावलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषी कपूर (Rishi Kapoor) हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत काम करत राहिले. ऋषी कपूर यांचा शर्माजी नमकीन हा चित्रपट त्यांच्या जाण्यानंतर प्रदर्शित झाला. ऋषी कपूर यांची केवळ कारकीर्दच नाही तर त्यांचे वैयक्तिक आयुष्यही खूप मनोरंजक होते. जेव्हा ऋषी कपूर दुबईमध्ये आपल्या एका मित्रासोबत आशा भोसले-आरडी बर्मन नाईट कॉन्सर्टसाठी गेले होते. त्यावेळी दाऊद गँग अर्थात डी गँगच्या एका माणसाने त्यांना विमानतळावर पाहिलं. ऋषी कपूर (Rishi Kapoor) विमानतळाच्या बाहेर येताच एक माणूस त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला दाऊद साब बात करेंगे! जेव्हा ऋषी कपूर यांनी काहीशी शंका आणि काहीशा भीतीमध्ये फोन घेतला… खुद्द दाऊद इब्राहिमने त्यांना त्याच्या घरी बोलावलं होतं. त्यांच्यापुढे पर्यायच नसल्यामुळे ऋषी कपूर यांना दाऊदच्या भेटीला जावं लागलं. 



...म्हणून ऋषी कपूर यांनी दिला नकार


जेव्हा ऋषी कपूर दाऊदच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांचं स्वागत स्वत: दाऊद करतो. तो दारू पीत नसल्यामुळे त्यांना चहा आणि बिस्किटं दिली गेली. यानंतर दाऊदने ऋषी कपूर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुंबई कोर्टात दाऊदने करवलेल्या एका मर्डरचा किस्सा देखील त्याने ऋषी कपूर यांना सांगितला. ऋषी कपूर त्याच्या घरून निघण्यापूर्वी दाऊदने त्यांना सांगितलं, ‘तुम्हाला कधीही काहीही लागलं पैसे किंवा काहीही, बिनधास्त मला सांगा’. पण ऋषी कपूर यांनी त्याला नकार दिला. 


दुसऱ्यांद भेट दुबईत


ऋषी कपूर यांची दाऊदशी दुसरी भेटही दुबईमध्येच झाली. 1989 साली ऋषी कपूर त्यांच्या पत्नी नितू यांच्यासोबत एका लेबेनीज शॉपमधून बुट खरेदी करत होते. त्यावेळी दाऊद स्वत: त्या दुकानात होता. त्याच्यासोबत त्याचे किमान 10 बॉडीगार्ड होते. दाऊदच्या हातात मोबाईल देखील होता. ज्या काळात भारतात मोबाईल आला देखील नव्हता, तेव्हा दुबईत दाऊद मोबाईल वापरत होता!


यावेळी देखील दाऊदने ऋषी कपूर यांच्यासाठी त्या दुकानातून काहीतरी खरेदी करून देण्याची तयारी दाखवली. पण याही वेळी ऋषी कपूर यांनी त्याला नकार दिला. कदाचित दाऊदला नकार देणाऱ्या काही मोजक्या मंडळींपैकी ऋषी कपूर एक असावेत! त्या वेळी दाऊदने नंतर ऋषी कपूर यांना त्याचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक दिला. पण त्याबदल्यात ऋषी कपूर यांना मात्र त्यांचा वैयक्तिक क्रमांक देता आला नाही. कारण तेव्हा भारतात मोबाईलच नव्हते!