VED Box Office Collection Day 10 : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा नुकताच 'वेड' (Ved) हा चित्रपट प्रदर्शित झाला. खासगी आयुष्यात सगळ्यांची चाहती असणाऱ्या या जोडीनं मोठ्या पडद्यावरही जादू केली आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना खरंच वेड लावलं आहे. चित्रपटाचा हा दुसरा आठवडा सुरु असताना चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला आहे. रितेश आणि जिनिलियाच्या 'वेड' चित्रपटानं प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारीच 5.70 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर रितेश आणि जिनिलियाच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनं सगळ्यात लोकप्रिय ठरलेल्या 'सैराट' चित्रपटालाही मागे टाकत एक नवीन विक्रम केला आहे. (Genelia and Riteish Deshmukh's Ved Box Office Collection) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती चित्रपट समिक्षक तरण आदर्शनं ट्विटरवर पोस्ट शेअर करत केला आहे. चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. या कमाईत 27.50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. पहिल्या आठवड्यात वेडने 10 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 12.75 गल्ला केला. चित्रपटान आतापर्यंत 33.42 कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. (Ved Box Office Collection Broke Record Of Sairat Movie) 



तीन दिवसांत 10 करोडची कमाई 


तरण आदर्शच्या ट्विटनुसार, वेडने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशा प्रकारे, मराठी चित्रपट असल्याने त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जबरदस्त आहे. वेडने पहिल्या दिवशी २.२५ कोटींची कमाई केली. त्यानंतर शनिवारी 3.25 कोटींचा व्यवसाय केला. आणि रविवारी या चित्रपटाने 4.50 कोटींचा गल्ला जमवला. अशा प्रकारे या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 10 कोटींची कमाई केली आहे. 



हेही वाचा : अपहरण, 3 दिवस अन्नपाण्याशिवाय... Model नं केला धक्कादायक खुलासा


या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) केलं आहे. या चित्रपटातून जिनिलियानं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या पूर्वी जिनिलीयानं हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'वेड' या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर अनेक कलाकार आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. तर जिनिलिया या चित्रपटाची निर्माती आहे.