मुंबई :  रितेश देशमुख त्याच्या विनोदबुद्धीसाठी ओळखला जातो. त्याचा कॉमेडी अंदाज अनेकांना आवडतो. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, तो आणि जेनेलिया डिसूझा टिक टॉक व्हिडिओ बनवून चाहत्यांचे मनोरंजन करत होते. दोघेही टिक-टॉकवर सतत सक्रिय होते. त्यांचे टिक टॉक व्हिडिओ सतत व्हायरल होत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे व्हिडिओ इतके मजेदार होते की कोरोना आणि लॉकडाऊनच्या तणावपूर्ण काळातही ते एखाद्याचा मूड सेट करू शकतात. रितेश-जेनेलियाचे मजेदार व्हिडिओ चाहत्यांमध्ये सतत लोकप्रिय होत होते. पण, देशात टिकटॉकवर बंदी आली. त्यावर रितेश देशमुखने एक मजेदार विधान केले आहे.


रितेश म्हणाला की, टिकटॉकच्या बंदीमुळे तो तात्पुरता बेरोजगार झाला. परंतु, इन्स्टाग्राममध्ये रील ऑपशन आल्याने त्याने सुटकेचा निश्वास सोडला. रितेश देशमुखने म्हटले आहे की, कठीण काळात त्याने आणि जेनेलियाने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी मजेदार व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.


एका मुलाखतीत रितेश देशमुख म्हणाला, 'लॉकडाऊन दरम्यान प्रत्येकजण कठीण काळातून जात होता. अशा परिस्थितीत आम्हाला वाटले की, आम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आम्ही स्वतःवर विनोद करायला लागलो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अशाप्रकारे आम्ही टिक टॉक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पण टिक टॉकवर बंदी आली. त्यामुळे असे वाटले की मी बेरोजगार झालो आहे. असे वाटले की अरे देवा आता मी काय करावे? जे काम होते ते गेले.