मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रितेश चाहत्यांच्या संपर्कात राहतो. रितेश त्याची पत्नी जिनिलिया (Genelia Deshmukh) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नुकतंच रितेशनं जिनिलियासोबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत जिनिलियाला अक्कल नाही असं त्यानं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


आणखी वाचा : 16 सप्टेंबर रोजी देशभरात कुठे ही चित्रपट पाहायला गेलात तर होईल फायदा, जाणून घ्या खास कारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेशनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश बोलतो की मी तिला माझं हृदय दिलं पण तिला गरज ही डोक्याची होती, त्यानंतर जिनिलिया रितेशकडे रागात पाहते. हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत दिल Vs दिमाग असे कॅप्शन रितेशनं दिलं आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


आणखी वाचा : ऐश्वर्या रायच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, कलाविश्वाला मोठा धक्का


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : गणपतीच्या आगमणासोबत रितेश-जिनिलियाच्या घरी 'या' पाहूण्यानं केली एण्ट्री


रितेश आणि जिनेलियाने 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केले. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.


आणखी वाचा : रशियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य आलं समोर, तरूणी सुंदर केस आणि त्वचेसाठी करतात 'या' पदार्थांचा वापर


रितेश गेल्या वर्षी टायगर आणि श्रद्धा कपूरच्या ‘बाघी ३’ या चित्रपटात दिसला. सध्या रितेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ट्रिलॉजीवर काम करत असल्याचे म्हटले जातं आहे. एवढंच नाही तर लवकरच आपल्याला रितेशला एका हॉरर-कॉमेडी पटात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार असल्याचे म्हटले जात आहे.