गणपतीच्या आगमणासोबत रितेश-जिनिलियाच्या घरी 'या' पाहूण्यानं केली एण्ट्री

जाणून घ्या, रितेशनं कोणती गाडी खरेदी केली.

Updated: Sep 2, 2022, 11:33 AM IST
गणपतीच्या आगमणासोबत रितेश-जिनिलियाच्या घरी 'या' पाहूण्यानं केली एण्ट्री title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि पत्नी जिनिलिया (Genelia) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर रितेश आणि जिनिलिया दोघेही सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आणखी वाचा : बुडत्या Bollywood ला क्रिकेटर्सचा आधार; रणवीर-रणबीरला मिळणार डच्चू?

रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश-जिनिलिया आणि त्यांची मुलं रियान आणि राहिल दिसत आहेत. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रितेश व जिनिलियानं नवी गाडी खरेदी केली आहे. त्यांच्या घरी BMW iX या इलेक्ट्रिक कारचं आगमन झालं आहे. त्यानंतर ते दोघं अर्पिताच्या घरी याचं गाडीतून गेले होते. 

 आणखी वाचा : ट्रेनमधील पंख्याची टेक्नोलॉजी घरी वापरता येत नाही! कारण...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'काला चष्मा'नं जगावर गाजवलं अधिराज्य, गाणं लिहिणारं 15 वर्षाचा मुलगा आज करतोय 'हे' काम
या गाडीची किंमत 1.16 कोटी रूपये इतकी आहे. तर मुंबईत या आलिशान कारची ऑनरोड किंमत सुमारे 1.43 कोटी आहे. रितेशला गाड्यांचं भरपूर वेड असून त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे. यात मर्सिडीज बेंजपासून रेंज रोव्हर अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

आणखी वाचा : 'जो चार लोकांसमोर आपलं नाव घेऊ शकत नाही....', जेव्हा रेखा यांच्यावर जया बच्चन संतापल्या

रितेश गेल्या वर्षी टायगर आणि श्रद्धा कपूरच्या ‘बाघी ३’ या चित्रपटात दिसला. सध्या रितेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ट्रिलॉजीवर काम करत असल्याचे म्हटले जातं आहे. एवढंच नाही तर लवकरच आपल्याला रितेशला एका हॉरर-कॉमेडी पटात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार असल्याचे म्हटले जात आहे.