मुंबई : रशियन मुली किंवा स्त्रियांच्या सौंदर्याचं बऱ्याचवेळा उदाहरण दिलं जातं. एवढंच काय तर रशियातील स्त्रिया या जगातील सगळ्यात सुंदर महिलांमध्ये असतात. याचं कारण म्हणजे त्यांची त्वचा ही अतिशय क्लीन असते. दिसायला एकदम शार्प, उंच आणि त्यांचे केसही सुंदर असतात. रशियाच्या मुली या त्यांच्या चेहऱ्याची आणि केसांची काळजी घेतात.
रशियन मुलींबद्दल असे म्हटले जाते की त्या त्यांच्या लूककडे खूप लक्ष देतात. ज्याप्रमाणे अंघोळ करणं आणि ब्रश करण हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे आपल्या सौंदर्य टिकवून ठेवणं हे रशियन मुलींच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. शेवटी, रशियन मुली त्यांच्या त्वचेची आणि केसांची काळजी कशी घेतात? त्यांच्या सौंदर्याचे रहस्य काय आहेत? याबद्दल जाणून घ्या.
रशियन मुली त्यांच्या शायनी केसांसाठी देखील ओळखल्या जातात. रशियन मॅगझिन Eviemagazine नुसार, रशियन महिला त्यांचे केस निरोगी ठेवण्यासाठी त्यांचे केस नैसर्गिकरित्या कोरडे करतात. त्या हेअर ड्रायर किंवा इतर उपकरणे वापरत नाही. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहून केस लांब, दाट आणि शायनी राहतात.
प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल नास्तासिया ओवेचकिना (Nastasiya Ovechkina) यांच्यासह अनेक रशियन मुली त्यांच्या रेशमी केसांसाठी ओळखल्या जातात. नास्तासियानं मुलाखतीदरम्यान सांगितलं की, ती केसांना घरी बनवलेलं हेअर मास्क लावते. त्यामुळे केसांपर्यंत केमिकल पोहोचत नाही आणि केसांमध्ये चमक राहते.
असे म्हटलं जाते की रशियाची महारानी कॅथरीन द ग्रेट देखील तिची त्वचा परिपूर्ण ठेवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी दररोज सकाळी चेहरा आणि मानेला बर्फाने शेकतात. बहुतेक रशियन मुली त्यांची त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी बर्फाचे शेकतात किंवा जेड रोलर्स वापरतात.
एखाद्याला आपली त्वचा योग्य ठेवायचा असेल, तर ते चेहरा धुतल्यानंतर, बर्फाचा तुकडा पातळ कापडात गुंडाळून चेहरा शेका आणि मग मॉइश्चरायझर लावा. जर तुम्हाला बर्फ वापरायचा नसेल तर त्याऐवजी जेड रोलर वापरा. जेड रोलर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा आणि सकाळी त्वचेवर लावा.
हिवाळ्यात त्वचा कोरडी असते आणि रशियामध्ये हवामान हे खूप थंड असत. रशियन मुली त्यांच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी मिल्क बेस्ड क्लीन्सर वापरतात. कारण जर तुम्ही रसायनयुक्त क्लीन्सर वापरलात तर ते त्वचेतील नैसर्गिक तेल शोषून घेते.
याशिवाय रशियन मुली नेहमी त्यांच्या मानसिक आरोग्याची देखील खूप काळजी घेतात. त्या जास्त स्ट्रेस घेत नाही आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. ती नेहमी अशा गोष्टींचा आहारात समावेश करते, ज्यामुळे तिला दीर्घकाळ सुंदर राहण्यास मदत होते.