Genelia Riteish Deshmukh: स्टार अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या 'वेड' या सिनेमाने  रिलीजच्या आठ दिवसांत कोट्यवधींची कमाई केली  (VED Movie Box Office Collection) आहे. प्रदर्शनानंतर सिनेमाची सर्वाधिक कमाई असून 'वेड'ने सैराटचा रेकॉर्ड मोडला आहे. वेड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश आणि जिनिलिया अनेक ठिकाणी फिरत असल्याचं पहायला मिळतंय. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. (Riteish deshmukh genelia deshmukh wedding secret ved movie Entertainment marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिनिलियाला महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ खूप आवडतात. तिला पिठलं, भाकरी, ठेचा खुपच आवडतो, असा खुलासा तिने केलाय. माझ्या आई म्हणजेच सासूबाई दर गुरुवारी पिठलं भाकरी आणि ठेचा बनवतात. त्याचबरोबर, मी माझ्या आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष देते. महाराष्ट्रीयन पदार्थ आरोग्यासाठी अधिक उत्तम असतात, असं जिनिलिया म्हणाली.


जेव्हा मी जेवण बनवते तेव्हा मी तेल वापरत नाही. शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी जेवण बनवते, असंही जिनिलिया म्हणाली आहे. रितेशच्या वेड सिनेमाचं बॉलिवूडमधील दिग्गजांनी कौतुक केलंय. अभिषेक बच्चन, जॉनी लिव्हर या कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट करत रितेश-जिनिलियाची प्रशंसा केली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनी देखील सिनेमा उचलून धरल्याचं पहायला मिळतंय.


आणखी वाचा - अभिनेता सलमान खानमुळे थांबलय 'या' व्यक्तीचं लग्न; कारण...


दरम्यान, रितेश आणि जिनिलियाची प्रेम कहाणी कोणत्याही पटकथेपेक्षा कमी नाही. 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या सेटवर दोघंही पहिल्यांदा भेटले होते. रितेशचा हा डेब्यू चित्रपट होता, तर जिनिलिया देखील नावाजलेली अभिनेत्री होती. प्रेमात पडल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ही जोडी हिट ठरली.