`अनेकांनी कॉंग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला पण...`, रितेश देशमुखनं शेअर केला विलासरावांचा `तो` व्हिडीओ
Riteish Deshmukh Shared Video of Father Vilasrao Deshmukh : लोकसभा निवडणूक 2024 चा रिझल्ट येताच रितेश देशमुखनं वडील विलासराव देशमुखांचा व्हिडीओ केला शेअर
Riteish Deshmukh Shared Video of Father Vilasrao Deshmukh : 4 जून रोजी 2024 च्या लोकसभा निवडणूकीचा निकाल समोर आला. हा निकाल येण्याआधी सगळ्यांना वाटत होतं की भाजपचं यंदा बहुमतानं निवडूण येईल. पण सगळ्यांच्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं. या निवडणूकीत कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीसाठी खास ठरलं. भाजप ज्या ज्या ठिकाणी नेहमी निवडूण येते त्या ठिकाणी देखील यंदाच्या वेळी कॉंग्रेसनं बाजी मारली आहे. या सगळ्यात बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनं त्याचे वडील आणि दिवंगत कॉंग्रेस नेते विलासराव देशमुख यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
रितेशनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत विलासराव देशमुख हे एका सभेत भाषण करत असल्याचे पाहायला मिळते. त्यावेळी विलासराव देशमुख बोलताना दिसतात की 'लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस. इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालंय. अनेकांनी प्रयत्न केला काँग्रेसला संपवायचा. ते संपले पण काँग्रेस नाही संपलं. हा एवढा प्रचंड इतिहास काँग्रेसला आहे. त्यागाचा, बलिदानाचा. या काँग्रेसला देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आहे. या काँग्रेसला असं कोणी संपवू शकत नाही.'
कॉंग्रेसनं नेहमीच गरिबांचा विचार केला. काँग्रेसका हाथ आम आदमी के साथ, ही काँग्रेसची भूमिका आहे. आम आदमी म्हणजे समाजाच्या प्रत्येक जाती-धर्मातील गरीब माणूस. ही भूमिका कॉंग्रेसनं स्वीराकरली. महिलांचा सन्मान वाढवण्याचं काम कॉंग्रेसनं केलं. कालपर्यंत म्हणे 33 % आरक्षण होतं आता 50% झालं. आता 50% आमच्या भगिनींनी जिल्हापरिषद, नगरपरिषद, कॉर्पोरेशन या प्रत्येक ठिकाणी आता लोकसंख्येच्या 50 % मानाचं स्थान प्राप्त करून देण्याचं स्थान कॉंग्रेसनं दिलं. काँग्रेस कामाच्या बळावर मत मागतेय. आश्वासनांच्या बळावर नाही. बाकीचे लोक आश्वासनाच्या बळावर मत मागू इच्छितायत. कॉंग्रेस विचारांवर आणि केलेल्या कामांवर आम्ही मत मागतोय. उजळ माथ्याने तुमच्यासमोर येऊन मत मागण्याचा नैतिक अधिकार हा आमच्याकडे आहे काँग्रेसकडे आहे."
हेही वाचा : कायद्याच्या कचाट्यात अडकला अन्नू कपूर यांचा ‘हमारे बारह’ चित्रपट, बॉम्बे हायकोर्टाकडून बंदी
रितेशनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आजही हे ऐकूण अंगावर शहारे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'असा लोकांचा नेता आणि विचार होणे फारच अवघड आहे.'