रितेश- जेनेलियाच्या राहिलचा पहिला वाढदिवस
रितेश देशमुख आणि जेनेलिया फर्नांडिस- देशमुख. या जोडीच्या दुसरा मुलगा राहिलचा आज पहिला वाढदिवस. जेनेलियाने आपल्या लाडल्यासोबत फोटो इन्स्टाग्रामवर अपलोट केलाय.
मुंबई : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया फर्नांडिस- देशमुख. या जोडीच्या दुसरा मुलगा राहिलचा आज पहिला वाढदिवस. या वाढदिवसानिमित्ताने जेनेलियाने आपल्या लाडल्यासोबत फोटो इन्स्टाग्रामवर अपलोट केलाय. या फोटोची सध्या चर्चा सोशल मीडियावर आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन राहिलसोबतचा एक छान आनंदी फोटो पोस्ट करत पहिल्या वाढदिवसाचा आनंद व्यक्त केलाय.
जेनेलियाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिने राहिल याला खांद्यावर उचलून घेतल्याचे दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत जेनेलियाने त्यासोबत लिहिलेली कॅप्शन अनेकांचं लक्ष वेधत आहे.
या कॅप्शनमधून तिचं राहिलवर असणारं निखळ प्रेम व्यक्त होत आहे. 'राहिल… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला जेव्हा एखादा आविष्कार पाहावासा वाटतो, मी तुझ्या डोळ्यांमध्ये पाहाते आणि मीच एका आविष्काराला जन्म दिल्याचं माझ्या लक्षात येतं. माझ्यालेखी तू फार महत्त्वाचा आहेस', असे तिने म्हटलेय.
दरम्यान, मोठा मुलगा रियान आता अडीच वर्षांचा झाला आहे. रियानने जेनिलिया आणि रितेश यांचा परिवार पूर्ण केला. रियानने आपल्या चिमुकल्या पावलांनी देशमुख परिवारात आगमन केले. जेनेलियाने रियानला दोन वर्ष झाल्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या होत्या. तिने ट्विटरवर अतिशय हळव्या शुभेच्छा रियानला दिल्या होत्या.
जेनेलियाने ट्विटरवर लिहिले होते, 'माझ्या बाळा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अद्वितीय, मौल्यवान, सुंदर असलेले हे जग मी तुझ्या डोळ्यात पाहते. माझे जीवन धन्य केल्याबद्दल तुला धन्यवाद. देव तुझे भले करो'