मुंबईः लय भारी अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या सोशल मीडिया रिल्ससाठी भलताच प्रसिद्ध आहे. तो आणि त्याची बायकाे जिनेलिया हे दोघंही इन्स्टावर सतत काहीतरी हटके त्यांच्या बेधडक अंदाजातून रिल्स पोस्ट करत असतात. त्यांचे चाहतेदेखील त्यांच्या रील्स शेअर करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या काहीकाळ चित्रपटापासून रितेश अलिप्त राहिला असला तरी त्याच्या चाहत्यांसाठी तो लवकरच एका मोठ्या ऐतिहासिक भुमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचसोबत त्याचे अनेक चित्रपट हे लाईन अप आहेत पण सध्या रितेशच्या एका वेगळ्याच लुकची चर्चा आहे. तसेच रितेश एका आगळया वेगळ्या शोमधून प्रेक्षकांसमोर वेेगळ्या लुकमधून येणार आहे. 


'केस तो बनता है' हा एक प्रकारचा कॉमेडी शो म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. शोबद्दल बोलताना रितेशने म्हटले आहे की, “ही माझ्या आयुष्यातील सर्वात अवेडेट केस आहे! मी किती उत्साहित आहे हे मी सांगू शकत नाही. वरुण, कुशा आणि माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे प्रोजेक्ट आहे. या शोमध्ये तुम्ही जे काही मागू शकता ते सर्व आहे, लाफ्टर आणि अनेक मजेदार किस्से ज्याने प्रत्येकाचे मनोरंजन होणार आहे. मला खात्री आहे की संपूर्ण भारतातील प्रेक्षक हा शो एन्जॉय करतील. 


केस तो बनता है या पहिल्या कोर्टात, रितेश – जनता का वकील दिसेल, बॉलीवूडमधील काही मोठ्या व्यक्तिमत्त्वांवर विचित्र आणि विनोदी आरोप या कॉर्टातून लावले जातील ज्यांचा बचाव त्यांचे वकील करतील. गेस्ट सेलिब्रिटींचा निर्णय न्यायाधीश घेतील ज्याचा शब्द अंतिम असेल. 



रितेश देशमुखच्या केस तो बनता है चा प्रीमियर 29 जुलै रोजी Amazon miniTV आणि Fire TV वर होईल, दर शुक्रवारी नवीन भाग रिलीज होतील.