Ritesh Deshmukh Viral Video: अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याचबरोबर त्याचे अनेक व्हिडीओज हे सोशल मीडियावर (Ritesh Deshmukh Reel) व्हायरल होत असतात. अनेकदा तो आपलं रिल्सच्या माध्यमातून मनोरंजन करताना दिसतो. जेनेलिया आणि रितेश अनेकदा एकमेकांसोबतचे अतरंगी हटके व्हिडीओज हे सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सध्या असाच एक रितेशचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुखनं (Ritesh Deshmukh Marriage Tips) सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र दिला आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या तूफान कमेंट्स येताना दिसत आहेत. (ritesh deshmukh viral video on marriage tips goes viral netizens reacts)


रितेश देशमुखचा नवा रील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओज हे व्हायरल ज्यातून वैवाहिक जीवनाच्या टीप्स दिल्या जातात. अनेकांच्या वैवाहिक जीवनात काहीतरी वेगळेपण हे असतंच असतं. त्यातून अनेकदा नवरा बायकोमध्ये काही ना काही वाद हे होतंच असतात परंतु त्यातूनही नवरा बायको मार्ग काढतात. परंतु सध्या रितेश देशमुखनं सांगितला कानमंत्र ऐकून तुम्हीही खदाखदा हसू लागाल. रितेशनं नुकतंच त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून एक रिल शेअर केलं आहे त्यात तो म्हणतो की, 'जर तुमची पत्नी तुमच्याबरोबर जास्त कटकट करत असेल तर चप्पल उचला आणि ती सरळ घालून बाहेर जा. त्यापलीकडे जास्त काहीही विचार करू नका. नाहीतर नको ते होऊन बसेल'


हेही वाचा - विकी कौशल-कतरिना कैफ करणार बेबी प्लॅनिंग... पण आहे 'ही' अट?


काय आहे सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र? 


रितेशनं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं  आहे की, 'हॅप्पी मॅरिड लाईफ का मंत्रा' यावर नेटकऱ्यांच्या तूफान कमेंट्स येताना दिसत आहेत. तेव्हा सध्या हा व्हिडीओ भलताच व्हायरल होतो. या व्हिडीओला आत्तापर्यंत 3 लाख लाईक्स आले आहेत आणि या व्हिडीओला आत्तापर्यंत 35 लाख व्ह्यूज (Ritesh Deshmukh Latest Instagram Post) आले आहेत. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सगळीकडे तूफान गाजतो आहे. या व्हिडीओमध्ये तूम्ही पाहू शकता की रितेश देशमुख हा हातात चप्पल घेऊन प्रेक्षकांना सांगतोय की तुमची पत्नी तुमच्याबरोबर कटकट करत असेल तर चप्पल उचला आणि सरळ बाहेर घालून जा त्यावर जास्त काहीच करू नका नाहीतर नको ते होऊन बसेल. यावेळी त्यानं व्हाईट रंगाचा टीशर्ट घातला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा यांचा 'वेड' (Ved on Ott) हा चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही तूफान कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट गेल्यावर्षी मराठीतला सर्वात नंबर वन चित्रपट ठरला आहे.