Tujhe Meri Kasam Re-Release: महाराष्ट्रातील प्रेक्षकांची सर्वात आवडती जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा. रितेश आणि जेनेलियाने एकत्र काम केलेला पहिला चित्रपट 'तुझे मेरी कसम' पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'तुझे मेरी कसम' चित्रपटातून अभिनेता रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. याच चित्रपटाच्या सेटवर अभिनेता रितेश आणि जेनेलिया एकमेकांच्या प्रेमात पडले. आता या चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमधील काही जुने चित्रपट सध्या पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केले जात आहेत. अशातच आता तब्बल 21 वर्षांनी पुन्हा एकदा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्याने 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं म्हटलं आहे.  


'या' दिवशी होणार प्रदर्शित 


पुन्हा एकदा रितेश -जेनेलियाचा  'तुझे मेरी कसम' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल 21 वर्षांनी हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 13 सप्टेंबर 2024 रोजी हा रिलीज होणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये देखील खूप उत्सुकता आहे. 2003 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस हा चित्रपट थिएटरमध्ये चालला होता. 



रितेश-जेनेलियाच्या पोस्टमध्ये काय? 


अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाने इन्स्टाग्रामवर 'तुझे मेरी कसम' चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. यामध्ये दोघांनी चाहत्यांना पुन्हा एकदा  'तुझे मेरी कसम' चित्रपटाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे. हा चित्रपट खूप रोमँटिक असून चित्रपटात प्रेमात पडलेल्या दोन जिवलग मित्रांची कथा सांगितली आहे. या चित्रपटातील गाणी देखील खूप हिट ठरली आहेत. 


'तुझे मेरी कसम'च्या सेटवर प्रेमाला सुरुवात


अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट त्यांच्यासाठी खूपच खास आहे. याच चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. रितेश-जेनेलिया यांनी यानंतर तब्बल 10 वर्षे एकमेकांना डेट केली. त्यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. हा चित्रपट खूप हिट ठरला होता. पुन्हा एकदा 'तुझे मेरी कसम' चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे चाहत्यांमध्ये देखील खूप उत्सुकता आहे.