मुंबई : कोल्हापूर आणि सांगली शहरामध्ये पुराने चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांनी हात पुढे सरसावले आहेत. सामान्य जनतेपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी पूरग्रस्त भागांमध्ये शक्य तेवढ्या मदतीचा हात पुढे केला आहे. कोल्हापूर आणि सांगली शहरात पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलियाने देखील पुरग्रस्तांना २५ लाखांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे त्या दोघांनी २५ लाखांचा चेक सोपावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या ट्विट अकाऊंटच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलियाने केलेल्या मदतीची माहिती दिली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 'रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाखांचे योगदान दिले आहेत, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.' अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी दोघांचे आभार मानले आहेत.