मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीचे दोन मोबाईल फोोन क्लोन करण्यात आले आहेत. मोबाईलचा डिजिटल डेटा तपासल्यानंतर रिया, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, शोविक चक्रवर्ती आणि जया यांच्यात बरीच व्हॉट्सऍप चॅट समोर आली आहेत. सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्ती सुशांतच्या पैशांचा वापर स्वत:च्या वैयक्तिक खर्चासाठी करत असल्याचं व्हॉट्सऍप चॅटच्या तपासात समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतच्या डेबिट कार्डचा पिन नंबर रियाला सॅम्युअल मिरांडाच्या मदतीने माहिती झाला होता. रिया चक्रवर्ती २०१७ साली नार्कोटिक्स सब्सटेंसचा वापर आणि खरेदी करण्यात सामील होती. रिया आणि सॅम्युअल मिरांडा यांच्यात १७ एप्रिल २०२० आणि १ मे २०२० ला शोविक चक्रवर्तीकडून २ बॅग वीड घेण्यासाठी १७ हजार रुपये देण्याचं बोललं गेलं, असल्याचं तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं आहे.



रिया आणि जया सहा यांच्यात १५ नोव्हेंबर २०१९ ला झालेल्या चॅट नुसार जयाने रियाला सीबीडी ऑईल दिलं होतं. जे सुशांतच्या कॉफीमध्ये टाकण्यात आलं होतं. अशाचप्रकारे ८ मार्च २०१७, १६ मार्च २०१७, ७ एप्रिल २०२०, २७ एप्रिल आणि २८ एप्रिल २०२०ला चॅट करण्यात आलं होतं. यामध्ये वीड विकत घेण्याविषयी आणि वापरण्याविषयी बातचित झाली. 


सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्जचा ऍन्गल समोर आल्यामुळे नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचीही यात एन्ट्री झाली आहे. एनसीबीनेही याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतसिंह प्रकरणी आता सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन यंत्रणा तपास करत आहेत.