मुंबई :  खूप काळापासून सिनेमांपासून दूर राहिलेली रिया सेन लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनेक दिवसांपासून तिचा कोणताच प्रोजेक्ट समोर आला नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिया सेन इंडस्ट्रीपासून दूर गेली असा समज पसरला होता. पण आता लग्नाच्या बातमीने रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिया तिच्या अनेक वर्षापासून रिलेशन असलेल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे.  तिचा हा बॉयफ्रेंड भारतीय क्रिकेटर आहे.
 रियाने 'स्टाइल' (२००१) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. शर्मन जोशी आणि साहिल खान यांच्यासोबत ती सिनेमात दिसली. त्यानंतर 'दिल विल प्यार व्यार' (२००२) , झनकार बीट्स (२००३), कयामत ( २००३), शादी नंबर-१ (२००५) अशा सिनेमातून ती दिसून आली. 


गायिका फाल्गुनी फाटकच्या 'चूढी जो खनके...' या व्हिडिओ अल्बममध्ये दिसली होती. 


रियाने याआधी खूपवेळे शिवमसोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातून त्यांच्या नात्याविषयी चर्चा रंगली होती. रिया सेन शिवम तिवारीसोबत लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे.