Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. सध्या कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. तर चित्रपट प्रदर्शनाच्या आगाऊ बुकिंगला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या चित्रपटाची प्रेक्षक प्रतिक्षा करत आहेत. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. फक्त इतकंच नाही तर करण जोहरच्या इतर ब्लॉक बस्टर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट देखील चांगली कमाई करणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण जोहरने चित्रपटाविषयी घोषणा केल्यापासून 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची चर्चा सुरू झाली आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगची सुरुवात झाली असून पहिल्या 24 तासांत 20 हजार हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. आगाऊ बुकिंगसाठी आज म्हणजे गुरुवारचा हा शेवटचा दिवस आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा चित्रपट देशभरात 3200 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2 तास आणि 48 मिनिटांचा आहे. इतके दमदार चित्रपट आधीच थिएटरमध्ये असताना चित्रपट कशी कमाई करणार या कडे सगळ्यांचे लक्ष आहे कारण सध्या थिएटरमध्ये 'ओपनहायमर', 'बार्बी' आणि 'मिशन इम्पॉसिबल 7' सारख्या हॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर त्यांची पकड बनवली आहे. अशात आता 'द केरला स्टोरी' आणि 'जरा हटके जरा बचके' चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कशी कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चांगली कमाई करणारा हा चित्रपट ठरेल का अशी आशा अनेकांना आहे.


'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या आगाऊ बुकिंगने आज सकाळपर्यंत सुमारे 50 हजार तिकिटे विकली. तर चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच सुमारे 1.5 ते 2 कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी कोणतेही मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार नसल्यानं या चित्रपटाला पहिल्या दिवशी चांगली कमाई करण्याची खूप चांगली संधी आहे. जर, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि संध्याकाळचे शो वाढले तर कदाचित 29 जुलै रोजी 14 कोटींची कमाई होऊ शकते. पहिल्याच दिवशी चित्रपट 10 ते 12 कोटींची कमाई करू शकतो तर शनिवारी चित्रपट 14 कोटींची आकडा पार करू शकतो. 


हेही वाचा : लेक पूजा भट्ट विषयी प्रश्न विचारताच महेश भट्ट म्हणतात, 'मी आलियाचा फॅन...'


रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे 14 कोटींची कमाई केली होती. आता करण जोहरच्या चित्रपटाची जबाबदारी 'वर्ड ऑफ माउथ'वर आहे. प्रेक्षकांनी दाद दिली तर चित्रपट पुढील 14 दिवस चांगली कमाई करू शकतो; नाही तर, करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटा प्रमाणेच या चित्रपटाला जास्त यश मिळणार नाही. चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि जया बच्चन आणि धर्मेंद्र यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसह, या चित्रपटात स्टार-कास्ट आहे. करणने या चित्रपटाला त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणेच ग्रँड ट्रीटमेंट दिली आहे.