मुंबई : नेहा कक्कर तिच्या गाण्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 60.6 मिलीयन फॉलोअर्स आणि ट्विटरवर 1.1 मिलीयन फॉलोअर्स आहेत. इंडियन आयडलपासून आपल्या प्रवासाची सुरुवात करणारी नेहा कक्कर आज या शोची जज आहे. नुकतंच तिचं 'दिल को करार आया रेप्रिझ' हे गाणं रिलीज झालं. जे गाणं चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. आता हे गाणं नेहाचा पती रोहनप्रीत सिंग गाताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहनप्रीत सिंगने केली नेहा कक्करची नक्कल
रोहनप्रीत सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकांउन्टवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते नेहा कक्करचं गाणं 'दिल को करार आया' गात  नाहीये तर नेहाची नक्कल करत आहे.  हा व्हिडिओ शेअर करण्याबरोबर त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ' थँक्यू थँक्यू बैठ जाइए, बैठ जाइए ओ हो हो हो...'  यानंतर तो नेहा आणि तिच्या आवाजाचं कौतुक करत आहे. रोहनप्रीतच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरभरुन कमेंन्ट केल्या आहेत. 



गेल्यावर्षी दोघांचं लग्न झालं 
रोहनप्रीत सिंग आणि नेहा कक्करचं लग्न गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्न झालं. कोरोना संसर्गामुळे लग्नात खूप कमी लोकं उपस्थित होते. विशेष गोष्ट म्हणजे या निमित्ताने त्यांनी त्यांचा नवीन म्युझिक व्हिडिओ देखील रिलीज केला. ज्यामुळे नेहा बर्‍याच दिवसांपासून चर्चेत राहिली होती.