नवी दिल्ली : फेब्रुवारी महिना उजाडताच आपल्याला आठवण येते ती म्हणजे व्हॅलेंनटाईन डे ची. आजपासून जगभरात व्हॅलेंनटाईन वीक ला सुरुवात झाली. मग प्रेमात असलेली सगळी जोडपी पार्टनरकडून काहीतरी खास गिफ्टची अपेक्षा करतात.  अनेकजण छानसं गिफ्ट देऊन हा दिवस साजरा करतात. व्हॅलेंनटाईन वीकची सुरूवात रोज डे पासून होते. एकमेकांना रोज देऊन प्रेम व्यक्त करताना ही रोमांटीक गाणी तुमच्या पार्टनरला खूश करतील. खास तुमच्यासाठी काही रोमांटीक गाणी...


दिल दिया गल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या टायगर जिंदा है चित्रपटातील हे गाणे. दिल दिया गल्ला. तुमच्या गर्लफ्रेंडला ऐकवा ती नक्कीच खूश होईल. 



कौन तुझे यूं प्यार करेगा जैसे मैं करता हूं


२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या एमएस धोनी चित्रपटातील हे गाणे अनेकांच्या आजही ओठी आहे. तुमच्या गर्लफ्रेंडला मनवण्याचा यापेक्षा सुंदर गाणे कोणते असेल.



इतनी सी बात हैं


अरिजीत सिंगच्या आवाजातीलहे सुंदर गाणे या व्हॅलेंनटाईन डे ला आपल्या पार्टनरला समर्पित करा.



हमसफर


वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटातील 'ए मेरे हमसफर' हे गाणे तुमच्या नक्की लक्षात असेल. हे गाणे देखील तुमच्या पार्टनरसाठी खास ठरेल.



नज्म नज्म


गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या बरेली की बर्फी चित्रपटातील गाणे लोकप्रिय झाले. एक अत्यंत सुंदर आणि मनाच्या जवळचे गाणे तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी नक्कीच मदत करेल.  
 



अशी अनेक गाणी आहेत जी तुम्ही तुमच्या पार्टनरला डेडिकेट करू शकता.